Home महाराष्ट्र अगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आमचे मतदान आरक्षणवाद्याला- ॲड. प्रकाश आंबेडकर

अगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आमचे मतदान आरक्षणवाद्याला- ॲड. प्रकाश आंबेडकर

78

✒️समाधान गायकवाड(विशेष प्रतिनिधी)

पाथर्डी(दि.30मार्च):- अगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आम्ही आमचं आरक्षण घालविणाऱ्या लोकांना मतदान करणार नाही तर आमचं मतदान आरक्षण वाद्याला असेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

मढी येथे आयोजित आदिवासी भटके विमुक्त समाजातील कार्यकर्त्यांचे राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, मार्गदर्शिका प्रा. अंजलीताई आंबेडकर, शिबिराचे स्वागताध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, भटके विमुक्त आघाडीचे राज्य सह समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव, प्रा. विष्णु जाधव, केशव मुद्देवाड, डॉ. धर्मराज चव्हाण, बालाजी शिंगे, अनिल मोरे, दगडू गायकवाड, मोहन राठोड, अमरसिंह चव्हाण, गजानन गिरी, अंकुश बलिया, बाबुराव फुलमाळी, भिमराव चव्हाण, द्वारका ताई पवार, अनिल जाधव, डॉ. जालिंदर घिगे, यांच्यासह राज्यभरातील भटके विमुक्त कार्यकर्ते या शिबिराला उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इथल्या राज्यकर्त्यांनी ओबीसी, मुस्लिम, भटके विमुक्त समाजाने आरक्षणाच्या प्रश्नावर ताकदीने आपले मत मांडले पाहिजे. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपले मत आरक्षण वाद्याला हे ज्या दिवशी आपण ठरवू त्या दिवशी आपल्याला कोणासमोर ही झोळी घेऊन जाण्याची गरज जाण्याची पडणार नाही. सत्ता ही विकासाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपण सत्ता काबीज करून विकासाकडे वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे आतापासूनच प्रचाराला लागा असे आवाहन त्यांनी केले. आज ओबीसी चे राजकीय आरक्षण गेले, उदया शैक्षणिक आरक्षण गेले तर काय होईल. आपला हा लढा उद्याच्या पिढीला स्वतंत्र ठेवण्याचा आहे. हा स्वतःचा लढा यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध होऊ आणि आरक्षण वाद्यालाच मतदान करू त्यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी च्या वतीने ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भटके विमुक्त समाजातील जेवढ्या छोट्या जातींच्या व्यक्तींना उमेदवार्यां दिल्या. तेवढ्या राष्ट्रवादीच्या वतीने शरद पवारांनी दिल्या तर मी आयुष्यभर त्यांचा घरगडी म्हणून राहील, अशी टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की सत्तेशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही कारण सत्ता हे शाश्वत सत्य आहे. त्यामुळे आज नाथांच्या पंढरीत भटके विमुक्त कार्यकर्त्यांनी सत्तेत वाटा मागायचा आहे. उत्तर कोल्हापूर विधानसभा पोट निवडणुकीमध्ये उभे असलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शहीद शेख यांना भटके विमुक्त, दलीत, आदिवासी व मुस्लिम बांधवांनी तेथे जाऊन त्यांचा प्रचार करावा, त्यांनी यावेळी केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, व मार्गदर्शिका अंजलीताई गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल छाया भोसले व संतोष भोसले त्याच बरोबर आंतरजातीय विवाह करणाऱ्या आदिवासी व बौद्ध समाजातील २ दाम्पत्याचा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सकाळी ११ वा. महापुरुषांना अभिवादन करून या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. प्रा. विष्णु जाधव यांनी प्रास्ताविक केले. ॲड. अरुण जाधव यांनी स्वागत केले. प्रा. किसन चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी वडार, तीरमली, पारधी, टकारी, कोल्हाटी, कैकाडी, म्हसनजोगी, काशीकापडी वासुदेव नाथपंथी दवरी गोसावी, बंजारा, लमाण, गोसावी, भोई, भिल्ल या छोट्या जाती समूहातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here