



✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.30,मार्च):-नकोडा परिसरात दिवसेन दिवस ट्रकद्वारे होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे गावात धूर प्रदूषण वाढलेले आहे. नागरिकांना प्रदूषणामुळे होणाऱ्या अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. वेकोली अंतर्गत असलेल्या पैनगंगा, मुगोली, घुग्घुस सायडिंग येथून ट्रकद्वारे दिवस-रात्र कोळसा वाहतूक केली जाते, भरधाव वेगानी जाणारे ट्रक धूर उडवत वातावरण प्रदूषित करतात. घुग्घुस-नकोडा गावातील जनसामान्य नागरीकांना अनेको आजारांचा सामना करावा लागत आहे.
त्यार्थी कोळसा वाहतुकी करिता पैनगंगा, मुंगोली, घुग्घुस सायडिंग हून रेल्वे मार्ग तयार केले तर कोळसा वाहतुकीसाठी उपयुक्त होईल. याकरिता वेकोली वणी क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक उदय कावळे यांना माजी जि.प समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी पत्रामार्फत मागणी केली आहे. तेव्हा तत्काळ रेल्वे साईडिंगचे कार्य सुरु करण्यात येईल असे मुख्य महाप्रबंधकांनी सांगितले आहे.


