



✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.29मार्च,);-तहसील कार्यालया समोर गेल्या पसतीस ( ३५) दिवसापासून डोंगरी जन परिषदेतर्फे गंगाखेड शहरातील तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील शेतकरी बांधवांचा विवीध मागण्याकरीता ज्यामध्ये 2018 सालातील कोरड्या दुष्काळाचे हेक्टरी 6800 रुपये अनुदान तात्काळ देण्यात यावे
2020-21 च्या खरीप हंगामातील सोयाबीन तूर पिकाचा पिक विमा तात्काळ देण्यात यावा 2021-22 च्या खरीप हंगामातील सर्व पिकाचा पिक विमा तात्काळ देण्यात यावा अशा मागंण्याकरिता उन्हतानामध्ये दिवस रात्र एक गाव एक दिवस याप्रमाणे गेली ३५ दिवस डोंगरी जन परिषदेचे शेकडो कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत.
तरीसुध्दा या राज्य सरकारकडून कसलाही प्रतिसाद मिळत नाहीये . म्हणून डोंगरी जन परिषदेच्या वतीने दिनांक २९/०३/२०२२रोजी तहसिलदार महोदयांच्या दालनामध्ये सामुदायिक आत्मदहन करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला होता.या शेतकरी बांधवांच्या आत्मदहनाचा इशाऱ्यानंतर प्रशासनाने झोपेतून उठून, डोंगरी जन परिषदेतर्फे करण्यात आलेली मागणी म्हणजेच पालकमंत्री श्री.धनंजय मुंडे हे जिल्हा दौऱ्यावर आल्यावर त्यांची डोंगरी जन परिषदेच्या शेतकरी बांधवांचा शिष्टमंडळ सोबत बैठक घडवून चर्चा करन्यात येईल असे लेखी आश्वासन आज दिनांक २८/०३/२०२२ रोजी मा. तहसीलदार महोदयांच्या कार्यालयाकडून श्री पंडितराव घरजाळे यांना सादर करण्यात आले.
म्हणून डोंगरी जन परिषदेतर्फे दिनांक २९/०३/२०२२ रोजी करण्यात येणारे सामुदायिक आत्मदहन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.आजपर्यंत जवजवळ 3५ गावांनी या मध्ये आतापर्यंत सहभाग नोंदविला आहे. तालुक्यांतील सगळ्या राजकारणी मंडळींनी, सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. शहरातील सर्व व्यापारी बांधवानी, महिलांनी युवकांनी सहभाग दर्शविला आहे.एवढा जन सहभाग असुनही, प्रशासनाकडून पडलेले हे पाहिले पाऊल नक्कीच स्वागतास्पद आहे ,व राज्य सरकारकडून डोंगरी जन परिषदेच्या व गंगाखेड तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांचा सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील हीच अपेक्षा.


