Home महाराष्ट्र जेऊर कुंभारी येथे क्रांतीसुर्य युवा प्रतिष्ठानची स्थापना – संस्थापक प्रितमराजे गायकवाड

जेऊर कुंभारी येथे क्रांतीसुर्य युवा प्रतिष्ठानची स्थापना – संस्थापक प्रितमराजे गायकवाड

92

✒️अहमदनगर प्रतिनिधी(बिपिन गायकवाड)

कोपरगाव(दि.29मार्च):- तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे क्रांतीसुर्य युवा प्रतिष्ठानची स्थापना अहमदनगर जिल्हा भिक्खु संघाचे अध्यक्ष पूज्य भंन्ते आनंद सुमन सिरी यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे धूप दीप व फुल पुष्पांनी पूजन करण्यात आले यानंतर क्रांतीसुर्य युवा प्रतिष्ठानच्या बोर्डाचे उद्घाटन पूज्य भंन्ते आनंद सुमन सिरीजी तसेच बुद्धिस्ट यंग फोर्स चे अध्यक्ष विजय त्रिभुवन साहेबराव कोपरे राजाभाऊ उशिरे नितीन शिंदे अरुण त्रिभुवन मनोज शिंदे राजाभाऊ पगारे महेश दुशिंग अविनाश शिंदे आनंद कोपरे या उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच सर्व उपस्थित मान्यवरांचे क्रांतीसुर्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने शाल देऊन सन्मान करण्यात आला यावेळी बुद्धिस्ट यंग फोर्स चे अध्यक्ष विजय त्रिभुवन या प्रसंगी शुभेच्छापर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपण प्रतिष्ठानचे नाव फार छान ठेवले आहे मात्र क्रांतीसुर्य या नावाला कुठलाही धक्का लागता कामा नये जेऊर कुंभारी सह तालुक्यात व अहमदनगर जिल्ह्यात आपल्या क्रांतीसुर्य युवा प्रतिष्ठानचे नाव लौकिक व्हावे तसेच समाजाच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी देखील सर्वांनी प्रयत्न करून क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे नाव उज्वल करावे तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो यानंतर ज्येष्ठ नेते साहेबराव कोपरे शुभेच्छा व्यक्त करताना म्हणाले की या जेऊर कुंभारी गावाचा इतिहास फार मोठा आहे.

या जेऊर कुंभारी गावात पहिला ग्रॅज्युएट व्यक्ती ही तुमच्या गायकवाड परिवारातून झालाय तसेच जेऊर कुंभारी गावातील सी.बी गायकवाड यांचे नाव कोपरगाव तालुक्यातच काय पण संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात त्यांनी केलेल्या सामाजिक धार्मिक कामातून त्यांच्या कामाचा ठसा प्रत्येक घराघरांमध्ये उमटवला आहे तेव्हा यापुढे या तरुण पिढीने सुद्धा आज क्रांतीसुर्य युवा प्रतिष्ठान स्थापन केली त्याबद्दल सर्व कमिटीला धन्यवाद देतो व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या त्यानंतर पूज्य भंन्ते आनंद सुमन सिरीजी यांनी उपस्थित उपासक-उपासिका यांना आपल्या मधुर वाणीतून क्रांतीसुर्य या शब्दाची सर्वांना समजेल अशा मधुर भाषेत महत्त्व सांगितले महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी कशा पद्धतीने समाज घडवण्याचे काम केले डॉ.बाबासाहेबांनी सर्वांसाठी सर्व समाजासाठी संविधानामध्ये कायदे करून ठेवले तेव्हा बाबासाहेब फक्त एका विशिष्ट समाजाचे नव्हते तर ते सर्व समाजाचे सर्वात मोठे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले समाजातील गोरगरीब दीनदलित पीडितांसाठी रात्रीचा दिवस करून अभ्यास करून सर्वांना समान न्याय देण्याचे कार्य केले अशा या महामानवाची आपण आपल्या जेऊर कुंभारी गावातील तरुण युवकांनी क्रांतीसुर्य युवा प्रतिष्ठानची स्थापना केली.

त्याबद्दल सर्वांना मंगल कामना आपणास काम करत असताना काही अडचणी आल्यास उपस्थितांमध्ये ज्येष्ठ मंडळींचा सल्ला घ्या मात्र गोरगरिबांची काम करण्यासाठी व समाजाची सेवा करण्यासाठी आज पासून सर्व जण कामाला लागा आपले सर्वांचे मंगल होवो असे आशीर्वाद देऊन शेवटी क्रांतीसूर्य युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रीतमभाऊ गायकवाड यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार व्यक्त केले त्यानंतर उपस्थितांसाठी क्रांतीसुर्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती त्याचाही उपस्थित सर्वांनी आस्वाद घेतला त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी क्रांतीसुर्य युवा प्रतिष्ठानचे संस्थापक प्रीतमभाऊ गायकवाड अध्यक्ष- साईनाथ गायकवाड उपाध्यक्ष- राहुल गायकवाड सेक्रेटरी- राज गायकवाड सचिव- सुहास गायकवाड खजिनदार- प्रशांत गायकवाड संघटक- विशाल गायकवाड, रोशन माळी सल्लागार- संदीप गायकवाड बिपिन गायकवाड राम गायकवाड बाळासाहेब गायकवाड नवनाथ गायकवाड तसेच सदस्य- बाबासाहेब गायकवाड सार्थक गायकवाड आकाश गायकवाड चैतन्य गायकवाड तुषार गायकवाड सुनील गायकवाड दिनेश गायकवाड पप्पू गायकवाड अशोक गायकवाड दिपक गायकवाड मनोज गायकवाड श्रीनाथ पवार अजित बनसोडे बबलू गायकवाड प्रमोद गायकवाड संकेत गायकवाड शेखर गायकवाड सागर गायकवाड रवि गायकवाड आशिष गायकवाड श्याम गायकवाड आदींची क्रांतीसुर्य प्रतिष्ठान समितीची कमिटी तयार करण्यात आली असून…

यावेळी या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश (मामा) गायकवाड सतिश गायकवाड कारभारी गायकवाड सखाराम गायकवाड मनोरंजन गायकवाड महेशभैया गायकवाड प्रयागराजे गायकवाड पंडित गायकवाड सागर देवकर पवार शुभम लिंबोरे यश गुरसळ सतीश देवकर विशाल लकारे राहुल लकारे सुमित वक्ते आकाश देवकर सागर गुरसळ विकी जगताप धम्म जगताप आदींसह संपूर्ण जेऊर कुंभारी गावासह पंचक्रोशीतील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here