



🔸भाजपा महिला आघाडी तथा प्रयास सखी मंच घुग्घुसतर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजन
✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.2मार्च):-दिनांक १ व २ एप्रिल रोजी घुग्घुस येथील केमिकल नगर वार्डातील प्रयास सभागृहात भाजपा महिला आघाडी तथा प्रयास सखी मंच घुग्घुसतर्फे मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत “गुढीपाडवा उत्सव व सांस्कृतिक महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उदघाटक मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा अध्यक्ष विधीमंडळ लोकलेखा समिती महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. देवराव भोंगळे भाजप जिल्हाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, चंद्रपूर सौ. संध्याताई गुरनुले माजी अध्यक्ष जि.प. चंद्रपूर, सौ. राखीताई कंचर्लावार महापौर महानगर पालिका चंद्रपूर, सौ. वनिताताई कानडे उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी चंद्रपूर, कु. अल्काताई आत्राम अध्यक्ष भाजपा महिला आघाडी चंद्रपूर, श्री. राहुल पावडे उप महापौर महानगर पालिका चंद्रपूर, श्री. ब्रिजभूषण पाझारे माजी सभापती जि.प. चंद्रपूर, श्री. नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा चंद्रपूर, श्री. आशिष देवतळे जिल्हाध्यक्ष भाजयुमो चंद्रपूर प्रमुख पाहुणे श्री. विवेक बोढे प्रदेश उपाध्यक्ष भाजयुमो, सौ. नितुताई चौधरी माजी सभापती जि.प. चंद्रपूर, श्री. निरीक्षण तांड्रा माजी उपसभापती पं.स.चंद्रपूर, श्री. संतोष नुने माजी सरपंच घुग्घुस, श्री. राजकुमार गोडसेलवार माजी सरपंच घुग्घुस, श्री. संजय तिवारी माजी उपसरपंच घुग्घुस, श्री. हेमंत उरकुडे युवानेते घुग्घुस,श्री. सिनू इसारप माजी ग्रामपंचायत सदस्य घुग्घुस, श्री. साजन गोहने माजी ग्रामपंचायत सदस्य घुग्घुस, श्री. प्रकाश बोबडे माजी ग्रामपंचायत सदस्य घुग्घुस, श्री. विनोद चौधरी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष वाहतूक आघाडी घुग्घुस, श्री. पुनम शंकर माजी ग्रामपंचायत सदस्य घुग्घुस, श्री. हसन शेख माजी तंमुस अध्यक्ष घुग्घुस उपस्थित राहणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा शुक्रवार १ एप्रिल दुपारी १२ ते ५ पर्यंत प्रथम दिवस सर्व समावेशक रांगोळी स्पर्धा १)पुरस्कार: १५००/- २)पुरस्कार:१०००/- ३)पुरस्कार: ५००/- निंबू चम्मच स्पर्धा 1) पुरस्कार:१५००/- २) पुरस्कार:१०००/- ३) पुरस्कार: ५००/- बोरा रेस स्पर्धा १) पुरस्कार:१५००/- २) पुरस्कार: १०००/- ३) पुरस्कार: ५००/- रस्सीखेच स्पर्धा १) पुरस्कार: २०००/- २) पुरस्कार: १५००/- ३) पुरस्कार: १०००/- संगीत खुर्ची स्पर्धा १) पुरस्कार: १५००/- २) पुरस्कार: १०००/- ३) पुरस्कार: ५००/-.
शनिवार २ एप्रिल रोजी द्वितीय दिवस सायंकाळी ४ वाजता मराठी नववर्षा निमित्त महिलांची भव्य स्कुटर रॅली, सायंकाळी ५ वाजता एकल नृत्य १) पारितोषीक ३०००/- व शिल्ड २) पारितोषीक २०००/- व शिल्ड, ३) पारितोषीक १०००/- व शिल्ड. समूह नृत्य १) पारितोषीक ४०००/- व शिल्ड २) पारितोषीक ३०००/- व शिल्ड ३) पारितोषीक २०००/- व शिल्ड. फॅन्सी ड्रेस १)पारितोषीक १५००/- व शिल्ड २) पारितोषीक १०००/- व शिल्ड ३) पारितोषीक ५००/- व शिल्ड असे पारितोषीक देण्यात येणार आहे.
तरी मोठया संख्येत महिला भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


