




🔸महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सभाचे मुख्यमंत्री यांना निवेदन
🔹सात तालुक्यातील अंगणवाडी ताईचा समावेश
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.28मार्च);-महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सभा चे कार्याध्यक्ष इमरान कुरेशी यांच्या नेतृत्वात सोमवार ला दुपारी दोन वाजता विवीध मागनण्यासाठी हुतात्मा स्मारक येथुन निघून अंगणवाडी ताईचा मोर्चा थेट चिमूर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयावर धडकला.फेब्रुवारी महिन्यात राज्याचे प्रधान सचिव यांच्याशी अंगणवाडीच्या विवीध कर्मचारी यांनी चर्चा केली मात्र ती चर्चा निष्फळ ठरली. नुकताच राज्याचा बजेट सादर करण्यात आला यात अंगणवाडी ताईच्या मानधनात मासीक पेन्शन व नविन मोबाईल बाबत काहीही तरतुद करण्यात आली नाही. कोरोना काळात कशाची ही तमा न बाळगता अविरत सेवा देणाऱ्या सरकारच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेनाऱ्या अंगणवाडी ताई महागाईने भरकटल्या आहेत. त्यांच्या कडे कोणीही लक्ष दयायला तयार नाहीत.
त्यामुळे सोमवारला निराश अंगणवाडी कर्मचारी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात विवीध मागन्यासाठी मोर्चा काढला. मोर्चा चे रुपांतर सभे मध्ये झाले. महाराष्ट्र राज्य अंगणावाडी कर्मचारी सभा चे तालुका अध्यक्ष यांची भाषणे झाली. दरम्यान महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सभाचे कार्याध्यक्ष इमरान कुरेशी व अंगणवाडी कर्मचारी सभाचे अध्यक्ष माधुरी रमेश विर चिमुर, प्रभा विश्वनाथ चामटकर नागभीड, लता राजु देवगडे भद्रावती, ललीता सोनुले मुल, विद्या वारजुकर ब्रम्हपुरी, कमल बारसागडे सिंदेवाही, सुनीता कुंभारे वरोरा आदी पदाधीकारी यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी पुनम गेडाम यांच्या मार्फत मुख्यमंत्री, महीला व बालविकास मंत्री, आयुक्त एकात्मीक बालविकास प्रकल्प मुंबई यांना निवेदन दिले.
यावेळी चिमूर विधान सभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रतिनीधी भाजपाच्या महिला तालुका अध्यक्ष माया नन्नावरे यांनी विवीध मागन्याचे निवेदन स्वीकारले. मोर्चाला चिमूर, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपूरी, मुल, वरोरा, भद्रावती येथील हजारो अंगणवाडीताई उपस्थीत होत्या.




