Home महाराष्ट्र पत्रकारांवर हल्ला केल्यास तीन वर्षे कारावास – संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे

पत्रकारांवर हल्ला केल्यास तीन वर्षे कारावास – संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे

86

🔹प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची माणगाव व महाड तालुका कार्यकारिणी जाहीर

✒️माणगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

माणगाव(रायगड)(दि.28मार्च):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाची माणगाव व महाड तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी पत्रकार संरक्षण कायद्याबद्दल मार्गदर्शन केले.याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय दळवी, रायगड जिल्हा संघाटक प्रसाद गोरेगावकर, कोकण युवा संपर्क प्रमुख सागर पवार, माणगाव तालुका अध्यक्ष रिजवान मुकादम, महाड तालुका अध्यक्ष किशोर किर्वे, महिला अध्यक्षा रेश्मा माने, अभिजित ढाणीपकर, राकेश देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अध्यक्षस्थानावरून डी. टी. आंबेगावे म्हणाले की, पत्रकारांवर हल्ला केल्यास, हिंसाचाराचे कोणतेही कृत्य करील किंवा करण्याचा प्रयत्न करील, हिंसा करण्यास अपप्रेरणा, चिथावणी किंवा त्यास प्रक्षोभित करील अशा कोणत्याही अपराध्यास तीन वर्षे कारावासाची शिक्षा होईल तसेच पत्रकारांच्या मालमत्तेचे नुकसान केल्यास सदर व्यक्तीने वैद्यकीय खर्च आणि नुकसानभरपाई दिली नसेल तर ती रक्कम जणू काही ती जमीन महसुलाची थकबाकी होती असे समजून वसूल करण्यात येईल. महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१७ याबाबत त्यांनी माहिती दिली.

संघाचे कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रेय दळवी यांनी संकटकाळी आम्ही तुमच्या सोबत असल्याचा विश्वास दिला.याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या रायगड जिल्हा संघटकपदी प्रसाद गोरेगावकर, माणगाव तालुका अध्यक्षपदी रिजवान मुकादम, तालुका कार्याध्यक्षपदी सचिन पवार, तालुका संपर्क प्रमुखपदी मंगेश मेस्त्री, माणगाव तालुका कार्यकारिणी सदस्य मानसी महाडिक, विवेक काटोळकर, दत्ता नाईक, राजेंद्र बुंबळे आदी पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे निवेदन माणगाव तालुका अध्यक्ष रिजवान मुकादम यांनी तर आभार कार्याध्यक्ष सचिन पवार यांनी मानले. यावेळी माणगाव व महाड तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleउपजिल्हा रुग्णालयाचे त्वरित लोकार्पण करावे
Next articleचिमूर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेवर भाजप समर्थीत परिवर्तन पॅनलचा कब्जा- महाविकास आघाडी पॅनलचा चिंताजनक पराजय!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here