Home महाराष्ट्र धर्माबाद तालुक्यात गॅसदर वाढी विरोधात शिवेसेनेचे आंदोलन

धर्माबाद तालुक्यात गॅसदर वाढी विरोधात शिवेसेनेचे आंदोलन

204

✒️नांदेड प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)मो:-8767514650

नांदेड(दि.27मार्च):-महाराष्ट्रातील शिवसेनेची एकेकाळी ज्युनिअर पार्टणर असेलेली भाजप आता केंद्रात सत्तेत असून या सरकारने पाच राज्याच्या निकाल हाती येताच अपेक्षेप्रमाणे गॅस,पेट्रोल आणि डिझेल च्या दरवाढीला सुरवात केली आहे.याचा सर्वसामन्याला फटका बसत असून ही महागाई नियंत्रणात आणावी यासाठी धर्माबाद मध्ये शिवसेनेने केंद्र शासनाच्या विरोधात निषेध व्यक्त केला आहे.एकेकाळी घरगुती गॅस सिलेंडर केवळ ५०० रुपयात मिळत होते.आता हे दर ९७५ रुपये झाले आहे. २०१४ ला गरिबांच्या विकासाचा अंजेंडा घेऊन सत्तेत आलेलं सरकार निरंतर महागाई वाढ करत आहे.विशेष म्हणजे एकेकाळी महागाई डायन वाटणाऱ्या पक्षांना आत्ता मात्र डार्लिंग वाटत आहे.केंद्राने उज्वला योजनाच्या माध्यमातून लोकांना गॅस तर दिला आहे.परंतु वाढत्या महागाई मुळे गरीब कुटुंबाना भरणेच शक्य होत नाही.त्यामुळे गॅस ही समृद्ध अडगळ ठरत आहे.

ही वाढती महागाई नियंत्रणात आणण्यात हे सरकार अयशस्वी झाले तर याची किंमत नक्की चुकवावी लागेल.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख आकाश रेड्डी येताळकर,तालुक़ा संघटक गणेश गिरी,वि.स.संघटक शिवराज मोकलिकर, गणपत कात्रे,उपतालुक़ाप्रमुख संतोष मोरे,शहरप्रमुख अनिल कमलाकर,दिलीप बेलुरकर विभाग प्रमुख,वेंकट ममोड,दिलीप लिंगमपल्ले युवासेना तालुकाप्रमुख,मदन लिंगमपल्ल, सोशल मीडिया तालुक़ाप्रमुख, हनुमंत लिंगमपल्ले,ज्ञानेश्वर बालोड़, गौराज़ी पाटिल व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

चौकट

भारतीय जनता पक्षाचे नेते एकेकाळी गॅस दर वाढ झाली की संसदे पासून ते सडक पर्यंत आंदोलन करत होते.आता ते इतकी महागाई झाली तरी मूग गिळून गप्प आहेत.मात्र शिवसेना लोकांसाठी लढत राहील.

आकाश रेड्डी येताळकर
धर्माबाद,शिवसेना तालुका प्रमुख

शिवसेना हा पक्ष सामन्य माणसांसाठी लढणारा पक्ष असून घेतलेला वसा टाकणार नाही.
आमची ही लढाई चालूच असेल.

गणेश गिरी
धर्माबाद,शिवसेना तालुका प्रमुख

ग्रामीण भागातील उज्ज्वला योजनांचा लाभ घेतलेल्या अनेक लोकांच्या घरातील गॅस बंद झाला असून चुलीवर स्वयंपाक सुरु केला आहे.हे दुर्दैवी आहे.

शिवराज मोकलीकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here