Home गडचिरोली ओबीसी विभागाच्या वतीने अधिकाधिक सदस्यता नोंदणी करण्याचे ऍड. गोविंद भेंडारकर यांचे निर्देश

ओबीसी विभागाच्या वतीने अधिकाधिक सदस्यता नोंदणी करण्याचे ऍड. गोविंद भेंडारकर यांचे निर्देश

249

🔸जास्तीत जास्त ओबीसी बांधवांना काँग्रेसच्या डिजिटल सभासद नोंदणीत जोडून घेणार महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केला विश्वास

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.27मार्च):-गडचिरोली जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने स्थानिक विश्राम गृह गडचिरोली येथे काँग्रेस डिजिटल सभासद नोंदणी व विद्यापीठ पदवीधर नोंदणी संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला मुख्य मार्गदर्शक म्हणून ओबीसी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष ऍड.गोविंदराव भेंडारकर हे उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ओबीसी विभागाच्या वतीने अधिक सक्रिय होऊन कामाला लागण्याचे निर्देश भेंडारकर यांनी दिले.

जिल्ह्यात मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव असून अधिकाधीक समाज बांधवांना काँग्रेसच्या डिजिटल सभासद नोंदणीत जोडून घेणार असल्याचा विश्वास जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केला ते अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते ओबीसी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी रमेश चौधरी तर प्रदेश सचिव विनोद लेनगुरे यांची निवड झाल्याबद्दल नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी मुख्य अतिथी म्हणून ओबीसी विभाग उपाध्यक्ष उमाकांत धांडे, माजी आम.तथा प्रदेश महासचिव डॉ. नामदेवराव उसेंडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ.चंदा कोडवते, चौधरी सर, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, शहराध्यक्ष सतिश विधाते, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, अनुसुचित विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, शिक्षक विभाग अध्यक्ष देवाजी सोनटक्के, स्वयंम रोजगार विभाग अध्यक्ष काशिनाथ भडके, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, हरबाजी मोरे, घनश्याम वाढई, जीतेंद्र मूनघाटे, संजय चन्ने, भास्कर नरुले, गोहणे साहेब आरमोरी, नीता वडेट्टीवार, सह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने ओबीसी विभागाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here