Home महाराष्ट्र कोणी कितीही विरोध केला तरी नांदेडचा विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही-बांधकाम...

कोणी कितीही विरोध केला तरी नांदेडचा विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही-बांधकाम मंत्री तथा नांदेड चे पालकमंत्री ना. अशोकराव पा. चव्हाण

275

✒️नांदेड प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)मो:-8767514650

नांदेड(दि.27मार्च):- जिल्ह्यातील व नांदेड शहरातील आणि जिल्ह्याचा होत असलेला विकास अनेकांना पाहवत नाही. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठले असून विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. वास्तविक कोणी कितीही विरोध केला तरी नांदेड जिल्ह्याचा विकास थांबणार नाही. असे तेही म्हणाले नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कधीही कमी पडू देणार नाही अशी: संदिग्ध ग्वाही देतानाच काँग्रेसचे डिजिटल सदस्य नोंदणीत नांदेड जिल्हा राज्यात आव्हाल असा पाहिजे यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज दिल्या.

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथील भक्ती लॉन्स मध्ये शहर व जिल्हा काँग्रेसच्या कमिटीच्या वतीने डिजिटल सदस्य नोंदणीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालक मंत्री अशोकराव चव्हाण बोलत होते. नांदेड जिल्हा प्रभारी संपत कुमार. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आ. अमरनाथ राजूरकर. माजी मंत्री भास्कर रावजी पाटील खतगावकर. माजी मंत्री डी पी सावंत. माजी खासदार तुकाराम रेंगे पा. माजी खासदार सुभाष वानखेडे. आ. मोहन अण्णा हंबर्डे. आ. जितेश अंतापूरकर. माजी आमदार हणमंतराव पा. बेटमोगरेकर. अविनाश घाटे. महापौर सौ. जयश्री ताई पावडे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर. उपमहापौर अब्दुल गफार. स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी. डिजिटल नोंदणीचे शेअर समन्वयक विजय येवनकर. महिला व बालकल्याण सभापती अर्पणा नेरलकर. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पा. बेटमोगरेकर.जि.प. च्या मागी अध्यक्षा मंगला राणी अंबुलगेकर यावेळी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सदस्य नोंदणीसाठी सध्या अभियान सुरू आहे. या डिजिटल सदस्य नोंदणीत महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद पंचायत समित्या जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रत्येक गण. वार्ड. गटात. आणि गावागावात जाऊन जास्तीत जास्त सदस्य नोंदणी झाली पाहिजे. नांदेड जिल्हा विकासात ज्या पद्धतीने सर्वात पुढे आहे. त्या पद्धतीनेच सदस्य नोंदणी तही नांदेड जिल्हा अव्वल स्थानी राहिला पाहिजे. यासाठी जोमाने कामाला लागा असे सूचनाही पालक मंत्री अशोकराव चव्हाण यांनी यावेळी दिल्या. नांदेड जिल्ह्याच्या होत असलेला विकास हा विरोधकांना पाहोत नसल्यामुळे बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत. सर्व आरोपाच्या विधानसभेत मी समाचार घेतला आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपीची आम्ही पर्वा करत नाही त्यांना. विकास करता आला नाही. असेही ते म्हणाले. उलट विकास कामात खोडा घालण्याची त्यांची प्रवृत्ती घातक आहे.

असेही पालक मंत्री अशोकराव चव्हाण यावेळी म्हणाले. येत्या पाच दिवसात सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण करायचे असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात राहून सदस्य नोंदणीचे लक्ष ठेवावे असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपला प्रयत्न सुरूच आहे. नांदेड येथून निर्माण होणाऱ्या निर्मिती अधिक दर्जेदार व्हावी येथे शाश्वत मूलभूत. सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने. 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.कै. नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः चर्चा केली. निश्‍चितपणे या कामाचा प्रश्न मार्गी लागेल. यासाठी आपण मदत करू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे त्यामुळे लवकरच नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागेल. एक अध्यावत रोही स्मारक होईल आणि नांदेडच्या वैभवात भर पडेल. कुरुंदकर गुरुजीच्या विचारांचा वारसा नांदेडकरांना जपत यावा या अनुषंगाने आमचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकांमध्ये निश्‍चितपणे काँग्रेस पक्षाला सार्वधिक बहुमत मिळाले. नुकत्याच झालेल्या चार नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष राहिला आहे. आगामी काळातही काँग्रेसला नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष राहील अशी विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामाला लागली पाहिजे यासाठी आतापासूनच कामाला सुरुवात करा असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना सह प्रभारी संपत कुमार यांनी पालक मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. अतिशय शांत डोके ठेवून कमी बोल बोलत आपल्या कामातून पक्षाची ताकद वाढविण्याचे काम पालक मंत्री अशोकराव चव्हाण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

तर माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी केवळ अशोकराव चव्हाण यांच्यामुळे जिल्ह्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी मिळत असल्याचे सांगतानाच भाजपा फक्त स्वतःचा ढोल वाजवून घेत आहे. परंतु वास्तवात केवळ 29 पैकी 11 राज्‍यांमध्‍ये भाजपाला पूर्ण बहुमत आहे. यावेळी बोलताना काँग्रेसचे गटनेते आ. अमरनाथ राजूरकर म्हणाले की. की डिजिटल सभासद नोंदणी मध्ये नांदेड जिल्हा अव्वलस्थानी येण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागले पाहिजे. उरलेल्या पाच दिवसात या कामात स्वतःला झोकून देऊन प्रत्येक कार्यकर्ता यांनी सभासद नोंदणी केली तर निश्चितच आपण विक्रम नोंदणी करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हा अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या डिजिटल सभासद नोंदणीची माहिती सांगितली. तर डिजिटल सभासद नोंदणीचे समन्वयक विजय जेवण कर यांनी डिजिटल नोंदणी कशा प्रकारे करावे यांचे प्रात्यक्षिक करून दाखवितानाच शहराच्या विविध भागात सुरू असलेल्या सभासद नोंदणीची माहिती दिली. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पा. कोंडेकर यांनी सभासद नोंदणीत युवकांचा सहभागाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे तर उपस्थितांचे आभार किशोर स्वामी यांनी मानले. यावेळी आ. अमरनाथ राजूरकर यांची विधान परिषदेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल शेर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पालक मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर सभासद नोंदणीत उत्कृष्ट काम केलेल्या संघरत्न कांबळे. वर्षाताई संजय भोसीकर. शिवकांता हटकर गजानन आप्पाराव दत्ता हरी पा. चोडाखेडकर. संदीप मारुती बरगे मनोज मधुकर राव ढगे सूर्यकांत रेडी गौतम गोविंदराव कसबे यांच्या विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पप्पू पा. कोंडेकर. शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ.सौ. मीनल पाटील खतगावकर महिला काँग्रेसच्या मंगलाताई निमकर. डॉ. रेखा चव्हाण. स्मृती व्याहाळकर. अनुजा तेहरा. मीनाक्षी काकडे. काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष अँड. निलेश पावडे. संभाजीराव भिलवंडे .आनंद भंडारे जगदीश पा. भोसीकर. शिकार झाला उद्धव पवार रगनाथ भुजबळ. प्रल्हाद पा. ढगे. बालाजी गव्हाणे. भाऊसाहेब मंडलापुरकर. प्रीतम देशमुख .बालाजी पांडागळे. शिवाजी पा. पाचपिपळीकर. उमाकांत पवार युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष मारुती पा. सकतीथकर. विकी राऊत खेडकर. नितीन पा. झरीकर. संतोष बोनलेवाड. यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here