Home महाराष्ट्र “युक्रेन रशिया युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम” या विषयावर ऑनलाइन चर्चासत्र

“युक्रेन रशिया युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम” या विषयावर ऑनलाइन चर्चासत्र

245

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.27मार्च):-चिमूर – गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर, द्वारा संचालित तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारा कायम संलग्नित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर, जिल्हा चंद्रपूर, येथे अर्थशास्त्र विभागाद्वारा महाविद्यालयाचे सुवर्णमहोत्स वर्ष तथा भारताचे अमृत महोत्सव वर्ष या प्रसंगी दिनांक २७ मार्च २०२२ ला सकाळी १० वाजता “युक्रेन रशिया युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम” या विषयावर आधारित ऑनलाइन चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रात अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. कार्तिक पाटील होते. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. आर. प्रसाद, (प्राध्यापक) अर्थशास्त्र विभाग, पं. रविशंकर शुक्ल विद्यापीठ, रायपूर, छत्तीसगढ़ हे होते.

यांनी आपल्या भाषणातून युक्रेन रशिया युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम यावर सविस्तर चर्चा केली. त्यांच्या भाषणातून हे स्पष्ट झाले की, भारत देश हा आर्थिक दृष्ट्या मजबूत आहे आणि या युद्धाचा भारतीय विदेशी व्यापारावर काही प्रमाणात प्रभाव पडलेला आहे परंतु तो प्रभाव अल्प स्वरुपाचा आहे. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य कार्तिक पाटील यांनी सुद्धा युक्रेन रशिया युद्धाचा भारतीय विदेशी व्यापारावर होणाऱ्या परिणाम संदर्भात चिंता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. राजेश्वर रहांगडाले, अर्थशास्त्र विभागप्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर हे होते. तसेच या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन डॉ. नितीन कत्रोजवार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले. हे ऑनलाईन चर्चासत्र यशस्वी होण्याकरिता महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here