Home महाराष्ट्र हायकोर्टाने लिलाव प्रक्रिया स्थगित केल्याने वडार समाजही आंदोलन स्थगित करणार !

हायकोर्टाने लिलाव प्रक्रिया स्थगित केल्याने वडार समाजही आंदोलन स्थगित करणार !

303

✒️सातारा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

सातारा(दि.25मार्च):-लिलाव प्रक्रियेस हायकोर्टाडून स्थगिती मिळविल्याने वडार समाजाने गेले १६ दिवस सुरू ठेवलेले आंदोलन शनिवार दि.२६ रोजी १७ व्या दिवशी सकाळी ११ वा.स्थगित होणार आहे.अशी माहिती अध्यक्ष रामचंद्र नलवडे यांनी दिली.जिल्ह्यातील खाणपट्टे तात्पुरते परवाने शासनाच्या सुधारीत मंत्रिमंडळ व शासन निर्णयाप्रमाणे पारंपरिक वडार समाजातील व्यक्तींना व्यवसायासाठी प्राधान्याने मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र नलवडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. होणारा लिलाव मान्य नाही.असे निवेदन देऊन पदाधिकारी यांनी ठणकावून सांगितले होते.शिवाय, मुंबई याठिकाणी हायकोर्टाकडून स्थगिताचाही आदेश आणला आहे.

जिल्ह्यातील नागेवाडी सर्व्हे नं.३०८ मधील लिलाव प्रक्रियेमध्ये वडार समाजाकरिता एकूण १५ प्लॉट पैकी ४ प्लॉट राखीव ठेवलेले असून त्यापैलू २ प्लॉट लिलावणे वडार समाजासाठी व २ प्लॉट परमिटसाठी ठेवलेले असून ४ ही प्लॉट सलग एकाच ठिकाणी वडार समाजासाठीच राखीव ठेवून त्याचा लिलाव अन्य कोणालाही देवू नये.या प्रमुख मागणीसाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू ठेवलेले होते. परंपरागत व्यवसाय टिकुन रहावा. यासाठी महाराष्ट्र शासनाने शासनाच्या जमिनीवर खनिकर्म व्यवसाय करण्यासाठी वडार समाजाला लिलाव मुक्त अशी जागा देणे बाबत शासन निर्णय झालेला असतानाही जिल्हाधिकारी यांनी वडार समाजासाठी आरक्षित केलेल्या १२ हेक्टर १२ आर क्षेत्रामध्ये खनिकर्मासाठी लायक असे ४ भूखंड तयार करून त्यामधील २ भूखंडाचे लिलाव वडार समाजाने घ्यावेत.म्हणून जी काही जाहीर लिलावाची प्रक्रिया केली होती.

त्यास स्थगितीच्या माध्यमातून तिलांजली मिळाली आहे. वडार समाजावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी शासन निर्णयाचा आदर केला पाहिजे. परंपरागत व्यवसायाची वृद्धी होण्यासाठी वडार समाजाला शासकीय जागा प्रदान करून तेथे खनिकर्म करण्यासाठी खानपट्टा किंवा खाणपरवाना देणे गरजेचे आहे.शासकीय महसूल वाढीसाठी उर्वरित ११ प्लॉट असताना वडार समाजातील जागा लिलाबाबत ठेवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे मतही जिल्हाधिकारी यांच्या निवेदनात स्पष्ट केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here