




✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)
परळी(दि.25मार्च):-येथील ग्रामपंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरले असुन हया मुळे डेंगु मलेरिया ह्या सारखे रोग राई पसरण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून या कडे गावच्या सरपंच उपसरपंच यांनी दुर्लक्ष केल्यामुळे गावातील महिलांनीच पुढाकार घेऊन आज दिनांक 25 मार्च रोजी सरपंच अनूपस्थित राहिल्यामुळे सिरसाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच इम्रान पठाण यांना 402 सह्या असलेल्या महिलांच्या वतीने विविध मागणीचे निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गावात घंटा गाडी कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी निवेजन करण्यात यावे तसेच सिरसाळा बाजर पेठ झपाट्याने वाढत आहे.
त्याच बरोबर कचरा सुद्धा रोजच्या रोज वाढत आहे तरी ही जिमेदरी आपल्या ग्रामपंचायतची असुन ती जीमेदरी स्वीकारून जागोजागी कचरा कुंड्या बसवून आठ दिवसात घंटा गाडी फिरवण्यात यावी अन्यथा महिलांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल अशी मागणी निवेदन कर्ते चौधरी सोनाबाई, सय्यद जाकेरा , कल्पना सोनी, अनुसयाबाई सोनी, ललवाणी उज्वला ,ललवाणी पूनम, प्रवीण पठाण ,भारती शिवकन्या, जाधव वर्षा, अनिता दहिवाळ, डॉ.ललवाणी सुषमा डॉ.रश्मी डॉ.सोनवणे स्वाती ,प्रा.पाटील चारूशीला प्रा.मोरे अश्विनी प्रा.जाधव आशा प्रा. वाळके अरुणा, धोंडगे सुरेखा, प्रा.माने उषा आदीने केली आहे




