



✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.24 मार्च):-तालुक्यातील देवसरी येथील भगवती देवी मंदिरात एक दिवसीय आमचा गाव आमचा विकास अंतर्गत कार्यशाळा संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवसरीच्या सरपंच सौ.मिनाक्षी चंद्रमणी सावतकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून यशदा पुणे च्या प्रवीण प्रशिक्षिका सौ.गीता कांबळे, पं.स.उमरखेडचे विस्तार अधिकारी श्री.मधुकर मुंढे, डाॕ.बागल साहेब, कारखेडचे सरपंच श्री.कदम साहेब, लोहऱ्याचे सरपंच श्री.शिंदे साहेब होते.
सर्वप्रथम आमचे ग्राम दैवत माता भगवतीला सरपंच व उपस्थित महिलांनी पुष्पहार अर्पण केला. नंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण अभिवादन केला.देवसरीग्रामच्या वतीने सरपंच, उपसरपंच व सचिव यांनी प्रमुख पाहुण्याचे शाल व पुष्पहार देऊन स्वागत केले.
तसेच सर्व उपस्थित सरपंच, पोलीस पाटील, सचिव, मुख्याध्यापक, तलाठी, रोजगार सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी ताई आदी 14 गावातल्या ग्रामविकासाच्या सहभागी घटकांचे पुष्पहारांनी स्वागत केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. गजानन पाटील देवसरकर (उपसरपंच) श्री.संजय अंबोरे (सचिव), श्री.देविदास पाटील देवसरकर (पोलिस पाटील), श्री.बंडू पाटील देवसरकर,अमोल देवराये(संगणक ),आंबादास देवसरकर, प्रभाकर सावते, गजानन देवसरकर, राजु देवसरकर यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सरपंच प्रतिनिधी चंद्रमणी सावतकर यांनी केले.





