



🔹नुतन जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या भव्य सत्कार
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.25मार्च):-राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क अभियानाला गेवराई शहरात मोठा प्रतिसाद मिळाला असून मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड व जिल्हाध्यक्ष अॅड.राजेश्वर चव्हाण यांचे शहरात ठिकठिकाणी भव्य स्वागत झाले. विजयसिंह पंडितांना आमदार करण्यासाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबुत करा असे आवाहन यावेळी माजी खा.जयसिंगराव गायकवाड यांनी केले. कार्यक्रमात नुतन जिल्हाध्यक्ष अॅड.राजेश्वर चव्हाण यांचा गेवराई राष्ट्रवादीच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आयोजित केलेल्या संपर्क अभियानाला गेवराई शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. अभियान अंतर्गत नेत्यांनी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देवून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. गेवराई शहरात ठिकठिकाणी अभियानातील नेत्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. बाजार समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बैठक आणि नुतन जिल्हाध्यक्षांच्या सत्कार समारंभ प्रसंगी मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.ईश्वर मुंडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीताताई तुपसागर, प्रदेश उपाध्यक्षा कमलताई निंबाळकर, विद्याताई जाधव, वनिताताई चाळक, अनिता वाघमारे, रानीताई शेख, शहराध्यक्षा मुक्ताताई आर्दड, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, शहराध्यक्ष दिपक आतकरे, ऋषिकेश बेदरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी पक्ष बांधणीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे मंथन कार्यकर्त्यांनी केले पाहिजे, पक्षाची विचारधारा आणि महाविकास आघाडी सरकारने केलेली विकास कामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सक्षमपणे करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. नुतन जिल्हाध्यक्ष अॅड.राजेश्वर चव्हाण यांनी सत्काराला उत्तर देताना जिल्हाध्यक्ष म्हणून सदैव तुमच्या सेवेत असल्याचे सांगताना पक्ष बांधणीच्या संदर्भातील आढावा घेवून पक्ष संघटना मजबुत करण्याचे आवाहन केले. गेवराई विधानसभा मतदार संघातल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सेल आणि फ्रंटचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. आढावा बैठकीमध्ये सर्व सेल आणि फ्रंटचा आढावा घेण्यात आला.


