



🔹परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेतला
✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.25मार्च):-पोलिस स्टेशन जिवती च्या वतीने नक्षलग्रस्त व अतिदुर्गम आदिवासी मानिकगड पहाडावरील ग्रामस्था करिता भव्य मोफत रोगनिदान शिबीर या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन २४ मार्च २०२२ रोजी पोलीस स्टेशन जिवती येथे करण्यात आले होते.चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे तसेच अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या संकल्पनेतून आदिवासी ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याचे निदान व्हावे.
त्यांना वेळीच उपचार मिळावा तसेच स्त्रिया व बालकांच्या आरोग्याची काळजी घेता यावी व सामान्य जनतेला योग्य उपचार मिळाल्यास त्यांचे आरोग्य सुद्दढ राहील व त्यांना योग्य निरोगी जिवनमान जगण्यास मदत होईल या उदात्त हेतूने मोफत रोगनिदान शिबीर वैद्यकीय अधिकार्यांच्या सहाय्याने आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबिराचा लाभ परिसरातील ६०० ते ७०० ग्रामस्थांनी घेतला. या वेळी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून लगेच त्यांना आवश्यक असलेल्या औषधांचा पुरवठा करण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांचे आरोग्य विषयक प्रबोधन मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी पोलिस स्टेशन जिवती चे ठाणेदार सचिन जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र अहिरकर, डॉ. प्रवीण येरमे, डॉ. मिनल ठाकरे, डॉ. आशीष गुज्जनवार, डॉ. जोयशी, वार्ड बॉय विशाल पवार, अधिपरिचारिका बिंदू शामकुळे, पोलीस स्टेशन जिवतीचे अंमालदर शरद राठोड, रमाकांत केंद्रे, अमोल कामले, तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले व भव्य मोफत रोगनिदान शिबिर संपन्न झाले





