



🔹भाजपाच्या विविध मागण्यांना यश
✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.25मार्च):- भाजपातर्फे भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत
शुक्रवार २५ मार्च रोजी सकाळी नप घुग्घुसच्या कर्मचाऱ्यांनी केमिकल नगर वार्डातील तुटलेल्या नाली व सिमेंट कॉक्रिट रस्ता दुरुस्तीचे काम सुरु केले. सुरु करण्यात आलेल्या कामाची पाहणी सकाळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केली.
याप्रसंगी भाजयुमोचे विवेक बोढे म्हणाले विविध समस्यांचे निवेदन घुग्घुस नगर परिषदेला दिले होते अवघ्या दोन दिवसातच निवेदनाची दखल घेण्यात आली. केमिकल नगर वार्डात रस्ता दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे व बंद असलेले आरो मशीन सुरु करण्यात आले. हायमास्ट लाईट दुरुस्तीचे काम त्वरित सुरु करण्यात येणार आहे. वार्ड क्र. ४ व ५ येथे दलितवस्ती योजनेअंतर्गत विकास कामे करण्यासाठी एक कोटी तीन लाख सत्तावीस हजार रुपये मंजूर झालेले प्रशासकीय मान्यता आदेश व्हाट्सअप वर पाठविण्यात आला आहे. विविध समस्यांची तत्काळ दखल घेऊन काम सुरु केल्याबद्दल भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी घुग्घुस नप प्रशासन व मुख्याधिकारी अर्शीया जुही यांचे आभार मानले
दिनांक २३ मार्च रोजी घुग्घुस नगर परिषद समस्यांचे माहेरघर बनल्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी मुख्याधिकारी अर्शिया जुही यांना विविध मागण्याचे निवेदन दिले होते समस्या तत्काळ न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
घुग्घुस दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत वार्ड क्र.४ व ५ मधील विकास कामाचा समावेश करण्यात आला नाही या संदर्भात भाजपातर्फे दोन वेळा निवेदन देण्यात आले परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने भाजपातर्फे दिनांक १६/०१/२०२२ ते २३/०१/२०२२ पर्यंत सात दिवस तीव्र उपोषण करण्यात आले नंतर उपोषणाची सांगता करतांना १.४० करोड रुपयांचे विकास कामे करण्याचे लेखी आश्वासन नगर परिषदतर्फे देण्यात आले परंतु आता पर्यंत कामे सूरू करण्यात आले नाही. विकासकामे सोमवार पर्यंत सुरु न केल्यास नगर परिषद समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी निवेदनातून दिला होता.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बंद असलेले हायमास्ट लाईट सुरु करणे, केमिकल नगर येथील तुटलेली नाली व सिमेंट कांक्रिट रस्ता दुरुस्त करणे. बंद असलेल्या आरो मशीन त्वरित सुरु करणे, अश्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले होते.


