




✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.24मार्च);-तालुक्यातील डोंगरी जन परिषदेच्या वतीने दि 29.03.2022 रोज मंगळवारी सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा गंगाखेड तालुक्यातील डोंगर भागातील शेतकरी 22 फेब्रुवारी पासून गंगाखेड तहसील कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषण करत असुन प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे डोंगर भागातील शेतकरयांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे 2018 सालातील कोरड्या दुष्काळाचे हेक्टरी 6800रुपये अनुदान 2020 च्या खरीप हंगामातील सोयाबीन तूर पिकाचा पिक विमा 2021 चा पिकविमा देण्यात यावा.
या मागण्यासाठी गंगाखेड तहसील कार्यालय समोर डोंगर भागातील शेतकरी एक गाव एक दिवस बेमुदत साखळी उपोषणाला बसले असुन एक महीना झाला तरीही प्रशासनाकडून मागण्यामान्य होत नसल्यामुळे डोंगर भागातील शेतकरी दि 29.3.2022 रोज मंगळवारी तहसीलदार यांच्या चेंबर मध्ये सामुदायिक आत्मदहन करणार आहेत तरी प्रशासनाने जागेहोवुन शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून शेतकऱ्यांचे होणारे सामुदायिक आत्मदहन टाळावे असी विनंती डोंगरी जन परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे




