



✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.24मार्च):-येथील वार्ड क्रं. ६ तुकडोजी नगर गजानन मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून सायलीताई येरणे, भाग्यश्री हांडेताई युवती प्रमुख) विमलताई काटकर (बहुजन समाज अध्यक्ष,चंद्रपूर), शमाताई काजी, रुपाताई परसराम, अस्मिताताई डोणकर, मालाताई पेंदाम, दुर्गाताई परचाके (शक्ती बचतगट अध्यक्ष, वणी) ज्योतीताई सिडाम (महिला पोलिस,राजुरा) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यंग चांदा ब्रिगेड आदिवासी समाज महिला आघाडी शहर अध्यक्षा सौ. उज्वलाताई मंगेश उईके यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी छान असे भाषणातून मार्गदर्शन दिले. त्यानंतर जनाबाई निमकर यांनी गीत सादर केले. काही मुलींनी नृत्य सादर केले. त्यानंतर खेळ सुध्दा घेळण्यात आले. जसे निंबु चम्मच, रस्सीखेच, संगीत खुर्ची. त्यानंतर उपस्थित असलेल्या पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. पहिलं बक्षीस आदिवासी ग्रुप ला दुर्गाताई परचाके ( शक्ती बचतगट अध्यक्ष, वणी) यांच्या हस्ते देण्यात आले, व Tot Prize GDC group (रामनगर) ला, ज्योतीताई सिडाम ( महिला पोलिस, राजुरा) यांच्या हस्ते देण्यात आले, त्यानंतर tot Prize सोलो डान्स लावणी) नेहा पाटील (म्हातारदेवी) यांना अविनाश मेश्राम यांच्या हस्ते देण्यात आले, 2nd Prize सोलो डान्स (लावणी शितल झाडे नायगाव ) यांना यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते देण्यात आले, तसेच संगीत खुर्ची यामध्ये सौ. सुजाताताई उईके यांना पहिलं पारितोषिक व जनाबाई निमकर यांना दुसरं पारितोषिक देण्यात आले.
त्यानंतर निंबु चम्मच यामध्ये सौ. प्रियाताई चिंचोलकर यांना पहिल पारितोषिक व सौ. रिनाताई पेंदाम यांना दुसरं पारितोषिक सौ. उज्वलाताई उईके आदिवासी समाज महिला आघाडी शहर अध्यक्षा) यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच रस्सीखेच यामध्ये सुध्दा पहिलं पारितोषिक महिला ग्रुप (गजानन मंदिर येथील ) यांना व दुसरं पारितोषिक मुलींच्या ग्रुप ला देण्यात आले. यावेळी कार्यकर्ता सौ. मनिषाताई मेश्राम, सौ. नितुताई जयस्वाल, सौ. स्मिताताई कांबळे, सौ. विनाताई गुच्छाईत, सौ. सविताताई गोहणे, जनाबाई निमकर, सौ. सरिताताई पुसाटे, सौ. सरिताताई कोडापे, सौ. सुनिताताई आमटे, सौ. सुजाताताई उईके उपस्थित होते.


