Home Breaking News रक्तविर सेना फाउंडेशनचे बलिदान दिनानिमित्य शहीद क्रांतिवीरांना मानवंदना व रुग्णाला रक्तदान…

रक्तविर सेना फाउंडेशनचे बलिदान दिनानिमित्य शहीद क्रांतिवीरांना मानवंदना व रुग्णाला रक्तदान…

276

✒️रोशन मदनकर(उपसंपादक)

ब्रम्हपुरी(दि.23 मार्च) : देशातील युवकांच्या अंगात आझाद हिंदुस्तानाची कट्टरवादि संघर्षाची अंगार भरणारे स्वातंत्रवीर,युवकांची प्रेरणा शहीद¬¬-ए-आझम भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बलिदानाला आज 91 वर्ष झाले.

स्वतंत्र भारतासाठी कट्टरवादि विचार धरून देशाचे सुपुत्र हसत – हसत फ़ाशीवर चढले, आणि अमर झाले.
बलिदान दिनानिमित्य महिला रुग्ण संगीता देवढगले अर्हेर नवरगाव हिला रक्तविर तेजस राऊत नांदगाव(जाणी) व रक्तविर प्रज्वल जनबंधू अर्हेर नवरगाव यांनी रक्तदानाने दिले.

आजच्या युवकाला क्रांतीभक्तीची गरज असून त्यांनी स्वताला एक शिक्षित, संघठीत, संघर्षवादि, विचारधारा धरून देशातील तमाम बहुजन जनतेची सुरक्षा करावी.

ह्या विचारधारेला रक्तविर सेना फाउंडेशनचे अध्यक्ष निहाल ढोरे शहीद क्रांतिवीरांच्या बलिदान दिनानिमित्य कार्यक्रमात वक्तव्य करून रक्तवीरांना संदेश दिला.

तसेच रक्तविर सेनेच्या आणि क्रांतीवीरांच्या विचारधारेला चालना देण्यासाठी उपाध्यक्ष मायासिंग बावरी, कार्यकारणी संघठक प्रफुल ढोक, सचिव प्रदीप दर्वे, रूपम शिऊरकार, प्रणय ठाकरे,स्वप्नील राऊत, महेश देठे, शैलेश मेश्राम,निकेश पंचभाई, वैभव तलमले, सुरज तुपट, पवन बेदरे, मंगेश कोल्हे, संदीप कामडी, अविनाश रामटेके सत्यपाल गोठे, हर्षल फाये व अन्य सैनिकांनी इन्कलाब जिंदाबाद ची घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here