




✒️नासिक,जिल्हा प्रतिनिधी(विजय केदारे)
नाशिक(दि.23मार्च):-तब्बल दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या जावयाची धिंड काढण्यात यांना वडांगळी करना याहीवर्षी यश आले आहे सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे धुलीवंदन ते रंगपंचमी दरम्यान जावयाचा शोध घेऊन त्याची मनधरणी करून गाढवावरून धिंड काढण्याची अनोखी परंपरा यंदाही जपली जावई मिळवण्यासाठी वडांगळी करांना शक्कल लढवली त्यात ते यशस्वी झाले आणि ही अनोखी परंपरा संपन्न झाली.
अशी आहे परंपरा रंगपंचमी च्या शेवटच्या दिवशी वडांगळी करना जावई मिळाल्याने त्याची गाढवावरून मिरवणूक काढून सर्व मी आनंद लुटला होळी ते रंगपंचमी दरम्यान पाच दिवसात वडांगळी गावात कुठलाही जावई चुकूनही फिरकत नाही असा कोणी जावई फिरकलाच तर त्याला पकडून बंदिस्त केले जाते व संपूर्ण गावातून गाढवावर बसून त्याची धिंड काढली जाते त्यामुळे या अनोखा उत्सवासाठी जावई मिळवणे कठीणच असते त्यामुळे अखंड जावई शोधून त्याला काहीतरी खोटे सांगून गावात आणले जाते.
असा गवसला जावई गावातील बाळासाहेब यादव खुळे यांची मुलगी निफाड तालुक्यातील चितेगाव येथे दिली आहे जावई दौलत बाजीराव भांबरे हे नाशिक येथील एका कंपनीला कामाला असून त्यांना जमीन खरेदी करायची आहे यासाठी त्यांना गावातील व्यक्तींनी हिवरगाव येथे जमीन असून बघायला या असे सांगून त्यांना बोलून घेतले यानंतर गावातील काही तरुणांनी त्यांना गाठत तुम्हाला तुमच्या सासर्यांनी बोलवले आहे असे सांगून जावयाला थेट वडांगळी येथे आणले गावात उतरल्यावर मात्र गर्दी जमा झाल्याचे पाहून भामरे यांना काहीतरी भानगड आहे.
याची जाणीव झाली आता आपण पुरते फसलो गेलो आहे आता आपण फसलो गेलो याची जाणीव झाल्याने आलेल्या संकटाला तोंड द्यावे लागेल याची तयारी त्यांनी ठेवली व बळजबरी करू नका अशी विनंती त्यांनी ग्रामस्थांना केली पण वडांगळी कर कसे कुणाचे ऐकतील त्यांनी जावयाला सर्व प्रथा व जावई सामान किती मोठा आहे हे भाग्य कोणाच्या नशिबात नसते ही सुवर्णसंधी असल्याचे सांगून मिरवणुकीसाठी राजी केले धनंजय खुळे मनोज खुळे यांच्यासह काही तरुणांनी सायखेडा तून अकराशे रुपये भाडेतत्त्वावर गाढव आणले गाढव मिळाले जावई पण मिळाल्याने मिरवणुकीत अडथळा दूर झाला जवायचा साजशृंगार करून सुशोभित गाढवावर बसून मिरवणुकीस धुमधडाक्यात ढोल ताशाच्या गजरात विविध रंग गुलालाच्या उधळण करीत प्रारंभ झाला सुमारे तीन तासाची धमाल करीत मिरवणूक सासरे बाळासाहेब खुळे यांच्या दारासमोर विसर्जन झाली झाली




