



🔹मोठ्या संख्येने युवक आणि महिलांचा प्रहार मध्ये प्रवेश
✒️मोहोळ,तालुका प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)
कुरुल(दि.23मार्च):-करमाळा तालुक्यातील पाथुर्डी गावात लोकनायक वंदनीय आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे दिनांक 22/03/2022 वार मंगळवार रोजी रात्री 7 वाजता भव्य असे उद्घाटन करण्यात आले यावेळी शेकडो तरुणांनी,आणि शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थित आणि करमाळा तालुका संघटक नामदेव पालवे यांच्या नेतृत्वामध्ये,तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांच्या मार्गदर्शनात मलवडी गाव व शेजारील गावातील शेकडो युवकांनी आणि महिलांनी या ठिकाणी प्रहार मध्ये प्रवेश केला.
यावेळी लोकनायक बच्चुभाऊ कडू यांचा सेवा त्याग समर्पण संघर्ष हा विचार,करमाळा तालुक्यातील घराघरापर्यंत पोचवण्यासाठी महिला व युवकांनी शपथ घेतली,या कार्यक्रमात शेकडोंच्या वरती शेतकरी,युवक महिला स्वयंस्फूर्तीने मोठ्या जल्लोषात सहभागी झाले होते.,
*यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील यांनी सांगितले की,करमाळा तालुक्यात कायमस्वरूपी पिढ्यान पुढे राजकारण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी ज्याप्रकारे विकासाचे गाजर दाखवून तालुका भकास केला यांना शह देण्यासाठी तालुक्यातील गावागावात प्रहार चा कार्यकर्ता उभा करून सेवेचे राजकारण करणार..
यावेळी शहर अध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी,जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे कार्याध्यक्ष खालिद भाई मणियार शहर संपर्कप्रमुख जमीरभाई शेख,तालुकाध्यक्ष संदीप तळेकर जिल्हायुवा उपाध्यक्ष युनूस पठाण,करमाळा तालुका संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार,माढा तालुका अध्यक्ष अमोल केसरे,करमाळा महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्वातीताई गोरे,सोनाली ढावरे राणी चव्हाण,करमाळा तालुका सरचिटणीस प्रवीण मखरे,पत्रकार शीतलकुमार मोटे हर्षवर्धन गाडे,महिला करमाळा तालुका उपाध्यक्ष सुनिता ताई भोसले,शाखाध्यक्ष सुरेखा ताई देडगे करमाळा तालुका कार्याध्यक्ष शाहरुख शेख,माढा तालुका उपाध्यक्ष शेखर धोत्रे माढा तालुका विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,कृष्णा शिंदे,केम शहराध्यक्ष शामकुमार बोंगाळे,सचिन माने,विजय पवार,जनार्दन मंगवडे,प्रवीण मत्रे,शाखाध्यक्ष सोमनाथ जाधव उपाध्यक्ष भाऊसाहेब देडगे शेतकरी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


