Home Breaking News गेवराईत वाळू माफियांवर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांची मोठी कारवाई

गेवराईत वाळू माफियांवर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांची मोठी कारवाई

116

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.22मार्च):- जिल्ह्यात सध्या एकही वाळू घाट नाही, तरी देखील गोदा पात्रासह सिंदफणा नदीतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. आज पहाटे पाच वाजल्यापासून साडेबारापर्यंत कुमावतांच्या पथकाने गेवराई तालुक्यातील सावरगाव, राक्षसभुवन आणि खामगाव येथे छापे टाकून तब्बल २०० ब्रास वाळू जप्त केली.

या वेळी वाळुने भरलेले तीन हायवा तर वाळू भरत असताना एक हायवा जप्त केला. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे स्थानिक पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे वेळोवेळी कुमावतांच्या पथकाने मारलेल्या धाडीतून दिसून येते.

पहाटे सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना सावरगाव, राक्षसभुवन आणि खामगाव येथे वाळूसाठा करून ठेवल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती.त्यानंतर त्याठिकाणी पथकातील बालाजी दराडे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचार्‍यांनी छापे टाकून २०० ब्रास वाळू साठा जप्त केला तर वाळुने भरलेले तीन हायवा आणि एक वाळू भरत असताना असे चार हायवा जप्त केले. पुढील कारवाईसाठी ते गेवराई पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत. वाळूसह हायवा असा एकूण १ कोटी २ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here