




✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.22मार्च):-शिरूर कासार तालुक्यात, पाचशे रुपयांची लाच घेणं एका तलाठ्याला चांगलचं भोवलं असून त्याला बीड एसीबीने पंचासमक्ष पकडलं आहे. शेतकऱ्याकडे सातबारा, आठ अ, फेरफार उतारा कागदपत्रांसाठी 1 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडअंती 500 रुपये स्विकारण्याचे पंचासमक्ष तलाठ्याने मान्य केले आहे. नामदेव राजेंद्र पाखरे वय 36 असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
पाखरे हे बीडच्या शिरुर तालुक्यात असणाऱ्या गोमाळवाडा सज्जाचे तलाठी असून सध्या सध्या मंडळाधिकारी कार्यालय शिरुर येथे कार्यरत आहेत. पाखरे यांनी तक्रारदाराकडे सातबारा, आठ अ, फेरफार उतारा आदी कागदपत्रांसाठी 1 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडअंती 500 रुपये स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. या प्रकरणी पाखरे तलाठ्यावर बीड एसीबीने कारवाई केली आहे. दरम्यान याप्रकरणी बीडच्या शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.




