



✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.22मार्च):-धनगर आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडून खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांनी धनगर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे उपकार तमाम महाराष्ट्रातील धनगर समाज कधीच विसरणार नाही अशी प्रतिक्रिया धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली.धनगर आरक्षण अंमलबजावणी चा मुद्दा 70 वर्षांपासून रेंगाळत आहे. याला केंद्र व राज्य सरकार दोन्ही जबाबदार आहेत.
महाराष्ट्रातील 48 खासदार पैकी धनगर आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा ह्या खर्याखुर्या मर्द मावळ्या आहेत. लोकसभेत मुद्दा मांडून नवनीत राणा यांनी समाजासाठी खूप मोठं काम केलेला आहे. त्याचे उपकार महाराष्ट्रातील धनगर समाज कधीच विसरणार असल्याची प्रतिक्रिया धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली. सखाराम बोबडे यांनी त्यांचे फोनवरून अभिनंदनही केले. लवकरच परभणी जिल्ह्यात राणा दाम्पत्याच्या अभिनंदनासाठी धनगर समाजाच्या बैठका घेतल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


