



🔹अध्यक्षपदी मा. प्रफुल दिवेकर तर कोषाध्यक्षपदी मा. सिध्दार्थ दिवेकर यांची निवड
✒️सिध्दार्थ दिवेक(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.22मार्च):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी उत्सव समिती ची निवड करण्यात आली.
या सभेचे अध्यक्ष मा. कुमार केंद्रेकर साहेब (अध्यक्ष शांतिदूत समिती उमरखेड) तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. शांताबाई दिवेकर हे होत्या.
यावेळी सर्वांच्या वतीने 131वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या ◆अध्यक्षपदी मा. प्रफुल दिवेकर, ◆उपाध्यक्षपदी मा.शुद्धोधन दिवेकर, आकाश श्रवले ◆सचिव- अंकुश दिवेकर, नितीन आठवले ◆कोषाध्यक्ष- मा.सिध्दार्थ दिवेकर, प्रविण इंगोले ◆कार्याध्यक्ष- अनिकेत दिवेकर, नागराज दिवेकर, ◆सहसचिव- बुद्धभूषण इंगोले, कपिल दिवेकर, ◆संघटक- आकाश आठवले तर ◆सल्लागार म्हणून- मा.कुमार केंद्रेकर, मा.भीमराव दिवेकर, मा.राजू धबाले, मा.विजय दिवेकर, मा.शांताबाई दिवेकर, मा.यशोदा दिवेकर, मा.सुभद्राबाई पाईकराव, मा.यशोधरा धबाले, मा.भारताबाई दिवेकर, मा.उषाबाई इंगोले, मा.बेबाबाई गवंदे यांची सर्वांच्या वतीने निवड करण्यात आली.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील अनेक बौद्ध उपासक, उपसिका उपस्थित होते.


