



✒️नायगाव तालुका प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)मो:-8767514650
नायगाव(दि.22मार्च):-शिरूर अनंतपाळ नगरीचे भूमिपुत्र जेष्ठ नेते मा अँड संभाजीराव पाटील मालक यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभ केंद्रीय मंत्री मा ना श्री भगवंतराव खुब्बा साहेब व महाराष्ट्र राज्याचे क्रियाशील व लोकप्रिय मंत्री मा ना श्री संजयजी बनसोडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला अध्यक्षस्थानी पद्मभूषण डॉ अशोक काका कुकडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा आ संभाजीराव पाटील निलंगेकर,मा खा सुधाकरराव श्रृंगारे,मा श्री पंडितराव धुमाळ,मा श्री लिंबन महाराज रेश्मे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री बस्वराजजी पाटील नागराळकर, सद्गुरू शंकरलिंग शिवाचार्य महाराज, सद्गुरू राजशेखर शिवाचार्य महाराज अहमदपूर, सद्गुरू संगनबसव महास्वामीजी निलंगा आदि उपस्थित होते.
या वेळी बोलताना मा ना श्री संजयजी बनसोडे साहेब यांनी मा अँड संभाजीराव पाटील मालक यांच्या आज पर्यंत च्या इतिहासातील राजकिय कार्याविषयी अनेक विषयांवर भाष्य केले राजकारणात चारित्र्य संपन्नता हा गुण सर्वांनी जपणे गरजेचे असून गेल्या 50 वर्षांपासून अँड पाटील साहेब हे राजकीय क्षेत्रातील लातूर जिल्ह्यातील एक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व असून त्यांचा हा गुण राजकीय क्षेत्रातील सर्वांनी घेणे गरजेचे आहे आज पर्यंत पाटील साहेब यांनी देशाचे नेते आदरणीय खा श्री शरदचंद्रजी पवार साहेब,देशाचे माजी गृहमंत्री मा श्री शिवराजजी पाटील चाकूरकर साहेब तसेच माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांचे विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून मा अँड संभाजीराव पाटील मालक यांची ओळख असून पाटील साहेब हे 1973 ते 1974 उस्मानाबाद चे कृषी सभापती,जय जवान जय किसान सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, लातूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष, लातूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असे अनेक महत्त्वाच्या पदांवर आज पर्यंत आदरणीय मालक यांनी काम केले आहे असे जेष्ठ मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असावे.
या साठी मी स्वतः त्यांना अनेक वेळा संपर्क केला परंतु ते आज भारतीय जनता पक्षात आहेत आणि अशा जेष्ठ नेतृत्वाला भारतीय जनता पक्षानी भविष्य काळात आमदार श्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी विधानपरिषदेत संधी मिळऊन द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जर अँड संभाजीराव पाटील मालक हे जर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये असते तर मी स्वतः आदरणीय खा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कडे मागणी करून पाटील साहेब यांना जनतेच्या सेवेसाठी मोठे पद देण्यासाठी प्रयत्न केला असता पण राजकारण आपल्याच मनासारखं अस काही होईल अस नसतं आज अँड पाटील साहेब हे भारतीय जनता पक्षात आहेत आणि आमदार श्री संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब हे भविष्य काळात त्यांना विधानपरिषदेत संधी मिळऊन देतील या बाबतीत माझ्या मनात शंका नाही कारणं मा आमदार श्री संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या मध्ये ती क्षमता आहे हे मी जवळून पाहिले आहे असे मनोगत व्यक्त करून पाटील साहेब यांना निरोगी दिर्घ आयुष्य लाभो व त्यांची भविष्य काळात राजकीय व सामाजिक प्रगती घडत राहो ही सदिच्छा व्यक्त केले या वेळी संयोजक समितीचे प्रा एस एन पाटील, महादेव आवाळे, संतोष शेटे, सुचित लासूने, विशाल गायकवाड, अमर देवंगरे, ओम बरगे तसेच शहरातील व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..





