Home महाराष्ट्र जागतिक जल दिन निमित्य राम मेघे इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट येथे सामूहिक जलशपथ...

जागतिक जल दिन निमित्य राम मेघे इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट येथे सामूहिक जलशपथ आणि मजीप्रा आयोजित जलदिंडी मध्ये विद्यार्थी सहभाग

318

✒️बडनेरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

बडनेरा(दि.22मार्च):-स्थानिक प्रा राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, बडनेरा येथे केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियान कॅच द रेन अंतर्गत पाण्याचे महत्त्व टिकवून ठेवण्याकरिता दरवर्षी २२ मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. या वर्षीची थीम भूजल: अदृश्य आहे ते दृश्यमान करणे हि आहे. पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी, अयोग्य आणि अतिवापर होत असल्याचे सातत्यपूर्वक जाणवत आहे. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे हि काळाची गरज आहे.

जागतिक जल दिन साजरा करण्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जलसंपदा विभाग अमरावती द्वारे आयोजित “जलदिंडी” या कार्यक्रमात महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनीअरिंग चे विभागप्रमुख प्रा प्रविण खांडवे आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दिला तसेच जलदिंडी अंतर्गत मालटेकडी ते अभियंता भवन रॅली दरम्यान जलसंवर्धनाचे महत्व सांगत लोकांमध्ये जनजागृती केली. तसेच महाविद्यालयातील आयोजित कार्यक्रमात सर्व उपस्थित शिक्षक, शिकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी जागतिक जल दिनी सामूहिक जलशपथ वाचन आणि जलशपथ लिहून दिली.

कार्यक्रमाची रूपरेषा रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष सायवान यांनी प्रा प्रविण खांडवे यांच्या मार्गदर्शनात मांडली तसेच सामूहिक जलशपथ वाचन कार्यक्रम रासेयोच्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. अनुराधा इंगोले तसेच रासेयोचे सह-कार्यक्रम अधिकारी प्रा अतुल डहाने, प्रा. शुभम कदम, प्रा आशुतोष उगवेकर, प्रा गायत्री बहिरे, श्री. निशांत केने व रासेयो स्वयंसेवक यांच्या सहभागातून त्यांच्या विभागाच्या चालू वर्गात केले. सदर कार्यक्रमाला शासन निर्देशित सर्व कोविड नियमांचे पालन करीत आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व शिकेत्तर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजना करता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली, संगाबाअवि चे रासेयो संचालक डॉ. राजेश बुरंगे, अमरावती जिल्हा ग्रामीण चे समन्यवक डॉ नरेंद्र माने, बडनेरा क्षेत्रीय समन्यवक प्रा. सारंग धावडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, उपाध्यक्ष अॉड. उदयजी देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंतजी देशमुख, सचिव युवराजसिगजी चौधरी, सन्माननिय सदस्य शंकररावजी काळे, नितीनजी हिवसे, सौ. रागिनीताई देशमुख, डॉ. सौ. वैशालीताई धांडे व डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here