



🔹पत्रकार परिषदेत एमपीजे प्रदेशाध्यक्ष यांचे प्रतिपादन
✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.21मार्च):-देशाची शैक्षणिक, आरोग्य, अन्नसुरक्षा व इतर व्यवस्था या सर्व बाबींची जबाबदारी फक्त शासनावर टाकून चालणार नाही, तर जनतेला आपल्या अधिकारा प्रति जागरूक होउन आपले कर्तव्य पार पाडावे लागतील.
आज गतीला जनता स्तब्थ व तमासगीर बनून पाहत आहे.
संविधानाने दिलेले अधिकार जाणून घेवून ते प्राप्त करण्यासाठी एक आंदोलन उभे करण्याचा एमपीजेचा मानस असून अशा अधिवेशना द्वारे तो उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न असल्याचे मत मोहम्मद सिराज प्रदेशाध्यक्ष एमपीजे महाराष्ट्र यांनी पत्र परिषदेमध्ये मांडले ते संजोग भवन येथे जन अधिवेशन व राशन वर जनसुनवाई कार्यक्रमानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.एमपीजे जनतेत जागरूकता निर्माण करण्याचा तसेच सरकार वर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करते.असे सांगत सिराज पुढे म्हणाले की, देशाला जनतेच्या हिता मध्ये धोरण तयार करण्याची गरज आहे आणि या पॉलिसीला खाल पर्यंत पोहोचण्या साठी एजन्सी निर्माण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
[आज या जनसूनवाई च्या माध्यमातून जनतेच्या तक्रारी शासनास समोर याव्या, अधिकारी यांनी त्यांच्या समस्याचे निराकरण कशा पद्धतीने होऊ शकते ते पहावे व सरकार समोर मांडावे असा उद्देश होता.परंतु फारच खंताची बाब आहे आहे की जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी कोणत्याही अधिकारी व जनतेच्या प्रतिनिधींना, कर्मचाऱ्यांना वेळ मिळाला नाही ही फारच अशोभनिय बाब असल्याचे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली.]
राशन, शिक्षणा व इतर योजनासाठी 15, 40, 60 हजार अशी उत्पन्नाची अट घालण्यात आली असून एमपीजेची मागणी आहे की, ज्या मूलभूत गरजा संविधानाने दिलेले आहेत ते सर्वांसाठी आहेत आणि सर्वांना मिळायला हव्या.आमचा कोणत्याही पक्षाला विरोध किंवा सपोर्ट नसून जनतेसाठी आम्ही सगळ्या कडे जावून ते सोडविण्यासाठी कार्यरत राहू.एमपीजे कोणती नवीन क्रांती करणार या प्रश्नाचे उत्तर दाखल ते म्हणाले की देश स्वातंत्र्याच्या 70 वर्षा नंतरही फक्त योजना नव्हे संविधाना च्या उद्देशिकेचे मध्ये देण्यात आलेले मूलभूत अधिकार पण देऊ शकलो नाही.
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाबरोबर सर्वांना दर्जाची व समानतेची संधी प्राप्त व्हावी यासाठी नवक्रांतीसाठी जनआंदोलन उभे करणार असल्याचे मत सिराज यांनी मांडले.संजोग भवन येथे जन अधिकार अधिवेशन कार्यक्रमा नंतर पत्रपरिषद घेण्यात आली.यावेळी प्रदेशाध्यक्ष मुंबई मोहम्मद सिराज, प्रदेश उपाध्यक्ष उपाध्यक्ष अफसर उस्मानी ,प्रदेश जनरल सचिव अल्ताफ हुसेन,डॉक्टर फारुक अबरार, मोहसिन राज, डॉ. मुजाहीद सैय्यद, फिरोज अन्सारी उपस्थितीत होते.





