



✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)
नाशिक(दि.22मार्च):- महानगरपालिका क्षेत्रात विकास का कडून सर्व समावेश योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्यादुर्बल व अल्प उत्पन्न प्रवर्गासाठी राखीव सदनिका म्हाडाकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत हा मुद्दा आज विधिमंडळात गाजला याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रश्न मांडला त्याच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले हा प्रश्न अतिशय गंभीर असल्याने महापालिका आयुक्त बदली करावी असे आदेश सभापतींनी दिले आहेत.
महानगरपालिकेत तबल सातशे कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा गोप्य स्पोर्ट खुद्द राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या जानेवारी महिन्यात केला होता नाशिकमध्ये सर्वसामान्यांना घरे उपलब्ध व्हावी यासाठी म्हाडाच्या वतीने नाशिक महापालिकेकडे भूखंड दिले होते मात्र या भूखंडावर घरच निर्माण झाली नसल्याची धक्कादायक बाब आव्हाडांनी उजेडात आणलीहोती मंत्री यांनी म्हटले आहे की नाशिक महापालिका आयुक्त हे खोटे बोलत आहेत.
नाशिक महापालिकेच्या आयुक्तांनी आधी 34 प्रकल्प माढा सबंधी सांगितले त्यानंतर त्यांच्या नगर रचनाकाराने 84 असल्याचे सांगितले हे सगळे प्रकल्प सदनिका संबंधी होते आणि एक एकर च्या पुढचे लेआऊट किती आहेत याचा कुठलाही हिशोब द्यायला महानगरपालिका तयार नाही कारण ते लेआउट फक्त आयुक्तांच्या सहीने होतात याबाबत पोलीस खात्याकडे तक्रार करावी लागेल असा इशारा आव्हाड यांनी दिला.हा सर्व घोटाळा सातशे कोटीचा असल्याचा आरोप दरेकर यांनी यावेळी केला तसेच हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने नाशिक मनपा आयुक्त यांची बदली करण्याचे आदेश सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले आहे


