Home महाराष्ट्र तात्यासाहेबांच्या सत्यशोधकाला कंपनीकडून बुलेट भेट

तात्यासाहेबांच्या सत्यशोधकाला कंपनीकडून बुलेट भेट

253

🔹अविस्मरणीय क्षण – माझ्या प्रामाणिकपणाची पावती – नितेश माळी

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.21मार्च):-धरणगाव शहरातील मोठा माळीवाडा परिसरातील शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेले नितेश वासुदेव माळी हे गेल्या बारा वर्षांपासून हेटरो हेल्थकेअर लिमिटेड क्रिस डिव्हीजन या फार्मा कंपनी मध्ये अतिशय प्रामाणिक व एकनिष्ठपणे काम करीत आहे.

त्यांच्या प्रामाणिकता, कामाची योग्यता बघून कंपनीकडुन कंपनीचे व्हॉइस प्रेस्सीडेन्ट जॉली सर, सेल्स मॅनेजर दत्तात्रय धारूडकर सर, डिव्हिजन मॅनेजर मून सर, रिजनल मॅनेजर प्रफुल्ल सर आणि एरिया मॅनेजर हेमंत सर यांच्या हस्ते रॉयल इनफिल्ड कंपनीची 350 cc ची बुलेट भेट म्हणून दिली.माझ्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे, मी या क्षणाला कधीही विसरू शकत नाही. यापुढेही मी असेच प्रामाणिकपणे काम करत राहील. चांगल्या कामाचे चांगले फळ मिळते असे प्रतिपादन नितेश वासुदेव माळी यांनी केले.यासाठी शहरात सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. त्यांना मिळालेला ह्या पुरस्कारातून धरणगावाचे नाव देखील उंचावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here