Home महाराष्ट्र धरणगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

धरणगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

300

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.21मार्च):-शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तत्पूर्वी सर्वप्रथम शिवजयंती खरे जनक राष्ट्रपिता तात्यासाहेब महात्मा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कुळवाडी भूषण बहूजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवसेना सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, मनसे तालुकाध्यक्ष रविंद्र महाजन, तालुका सचिव राजू बाविस्कर, मनसे शहराध्यक्ष संदीप फुलझाडे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक भागवत चौधरी, उद्योजक वाल्मिक पाटील आदी मान्यवरांचा हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्या महापुरुषांच्या नावाच्या घोषणा देत जयजयकार करण्यात आला.

छत्रपतींना अभिवादन प्रसंगी राजू बाविस्कर म्हणाले की, शिवराय सर्वांसाठी प्रेरणा शक्ती आणि स्फूर्ती देणारे उर्जास्त्रोत आहेत. छत्रपतींनी बारा बलुतेदार व अठरा पगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेवुन स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे संकटांचे संधीत रुपांतर करुन त्यांनी शत्रूवर मात केली. त्यांचा प्रत्येकाने आदर्श घेतला पाहिजे. सध्या कोरोना महामारीचे सावट असून सर्वांनी मास्क परिधान करुन, गर्दी टाळून आणि सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असेही श्री. बाविस्कर म्हणाले. याप्रसंगी धरणगाव तालुकाध्यक्ष रविंद्र महाजन, तालुका सचिव राजू बाविस्कर, शहराध्यक्ष संदीप फुलझाडे, मुस्ताक शेख, कृष्णा पाटील, गणेश कोळी, ललित चौधरी, अशोक कोळी, सुनिल लोहार, महेंद्र तायडे, देवानंद चव्हाण, आबासाहेब वाघ आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here