Home महाराष्ट्र सचिन सूर्यवंशी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

सचिन सूर्यवंशी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

350

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.21मार्च):-महाराष्ट्र राज्य क्रिडा महासंघ जळगाव व जिल्हा क्रिडा महासंघ, हस्ती पब्लीक स्कुल दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० मार्च रोजी दोंडाईचा जि.धुळे येथे सा दा.कुडे धरणगाव जि. जळगाव येथील क्रिडा शिक्षक तसेच हॉलीबाल प्रशिक्षक सचिन लोटन सुर्यवंशी यांना प्रमुख अतिथीच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

त्यात ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, क्रिडा विभाग राज्य सहाय्यक संचालक चंद्रकांत कांबळे, उद्योजक अशोक जैन, क्रिडा महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर सर, क्रिडा उपसंचालक सुनंदा पाटील मॅडम, जिल्हा क्रिडाधिकारी आसाराम जाधव, कबड्डी राष्ट्रीय खेळाडू महेंद्र राजपुत, आनंद पवार सर , जळगाव जिल्हा क्रिडा महासंघाचे सचिव राजेश जाधव सर , शिवदत्त ढवळे आदी मान्यवराच्या उपस्थिती भाव्य दिव्य कार्यक्रम सपंन्न झाला. सचिन सूर्यवंशी सर गेल्या २१ वर्षा पासुन सा.दा.कुडे माध्यमिक विद्यालय धरणागाव येथे क्रिडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आता पर्यंत विविध राष्ट्रीय व राज्य पातळीचे खेळाडू घडवले आहेत.

सध्या ते धरणगाव तालुका समन्वयक म्हणून जबादारी सांभाळत आहे. तसेच जिल्हा अॅथेलेक्टीस संघाचे सदस्य म्हणून ही कार्यरत आहेत. विविध असोशीयनच्या माध्यमातून जिल्हाभरात त्यांचे योगदान आहे. ते खो – खो,मैदानी, हॉलीबॉल खेळाचे मार्गदर्शन म्हणूनही काम करत आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल विद्यालयाचे अध्यक्ष हेमलाल भाटीया सचिव प्रा.आर.एन. महाजन सर मुख्याध्यापक एस.एस.पाटील, जीवन पाटील तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच तालुका क्रिडा संघातर्फे सचिन सूर्यवंशी सराचा सत्कार करण्यात आला. तसेच परिसरातून त्यांच्यावर शुभच्छाचां वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here