Home महाराष्ट्र ब्रह्मपुरी तालुक्यात होत असलेल्या प्रदूषणाबद्दल नाम. विजय वडेट्टीवार यांना निवेदन…

ब्रह्मपुरी तालुक्यात होत असलेल्या प्रदूषणाबद्दल नाम. विजय वडेट्टीवार यांना निवेदन…

120

🔹नगर परिषदचे नियोजन सभापती तथा नगरसेवक महेश भर्रे व उदापूरचे सरपंच तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष सोनू नाकतोडे यांची तक्रार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.21मार्च):- ब्रम्हपुरी नगर परिषद क्षेत्रातील ब्रह्मपुरी- बोरगावरोडवर लागून असलेले रामदेवबाबा सालवंट प्लांट यापासून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या जीवघेण्या वायू व ध्वनी प्रदूषण व मानवी जीवनाला घातक ठरलेल्या उपद्रवी उद्योगाचे प्रदूषणा संबंधी तक्रार दि.22/02/2022 संदर्भीय प्रादेशिक अधिकारी विनोद शुक्ला यांच्या कडे लोकप्रतिनिधी व प्रदूषणग्रस्त यांचे म्हणणे ऐकून न घेता थातूरमातूर चौकशी केली व सदर रामदेवबाबा सालवंट प्लांट च्या संचालकाद्वारे गेल्या तेरा वर्षापासून सीआरएस फंडमधून कधीही प्रदूषणग्रस्त गावांना तक्रार होईपर्यंत त्यांच्या अडचणी विचारणा सुद्धा करण्यात आली नव्हती .व सदर फंडातून खर्च केल्याचे दिसून आले नाही.

तसेच ब्रह्मपुरी- आरमोरी व ब्रह्मपुरी -वडसा रोडवरील असलेल्या राईसमिल मुळे होत असलेल्या प्रदूषणमुळे शेतकऱ्यांचे अनेक शेत पिक मातीमोल होत आहेत .या संदर्भाने मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांना नगर परिषदचे नियोजन सभापती महेश भर्रे व उदापूरचे युवा सरपंच तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष सोनू नाकतोडे यांनी निवेदन सादर केले आहे. ब्रह्मपुरी नगरपरिषद श्रेत्राला लागूनच सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर नवेगाव ,बोरगाव, उदापूर ,मालडोगरी, झिरबोडी, परसोडी व अन्य ग्रामीण भाग आहे. तर नगर परिषद श्रेत्रातील पेठ वार्ड, रेल्वे टेशन रोड, शिवनगर, फुलेनगर ,कृष्ण कालनी ,स्टेट बँक कॉलनी, गणेश नगर ,सहकार नगर कॉलनी, नागेश्वर नगर कॉलनी ,ज्ञानेश नगर,टिळक नगर,धूम्मनखेडा वार्ड असून वरील सर्व गाव व वार्ड यांना मोठ्या प्रमाणात रामदेवबाबा सालवंट प्लांटमुळे त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे ब्रह्मपुरी -आरमोरी व ब्रह्मपुरी- वडसा रोड रस्त्यालगत असलेल्या राईसमिल मुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे .त्यांचा त्रास प्रवास करणाऱ्यांना होत आहे.

सदर होणाऱ्या धुळीमुळे सभोवतालच्या शेतक-यांना शेती नापीक झाल्याचे दिसून येत आहे. शेतकरी बंधू विवंचनेत पडले आहेत. परंतु वरिष्ठ अधिकारी व उद्योगपती यांची सांठगाट असल्यामुळे सर्वसामान्य, पिढीत ग्रस्त शेतकरी व सामान्य नागरिक गेल्या दोन वर्षाच्या कोरोणामुळे आर्थिक बाजू एकदम कमकुवत झालेले सर्वसामान्य जनता आवाज उठविण्याची हिंमत करीत नाही. वरील विषयाची सर्व माहिती घेऊन महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी एक प्रदूषणग्रस्त कृती समिती आपल्या निगराणीत मा. जिल्हाधिकारी साहेब यांचे नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील सरपंच ,लोकप्रतिनिधी , शहरी भागातील लोकप्रतिनिधी, सुशिक्षित लोक,शेतकरी, प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी, पिढतग्रस्त काही महिला व अन्य लोकांची समिती गठीत करून सदर उद्योगाबाबत प्रदूषण अधिकारी यांनी आतापर्यंत काय कारवाई केली। यासंदर्भात त्यांनी उद्योगपतींना सदर प्रदूषण दूर करण्याकरिता काय उपाय योजना करण्यास सांगितले याबाबत दक्षता कमिटी व जिल्हाधिकारी यांची बैठक तात्काळ लावावी अशी मागणी नगर परिषद नियोजन सभापती नगरसेवक महेश भर्रे व उदापुरचे सरपंच तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष सोनू नाकतोडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here