Home महाराष्ट्र स्मृतिशेष विठ्ठल बनसोडे आणि स्मृतिशेष त्रिवेणी बनसोडे यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

स्मृतिशेष विठ्ठल बनसोडे आणि स्मृतिशेष त्रिवेणी बनसोडे यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

389

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

सिरसाळा(दि.20मार्च):- रेवली ता परळी वै येथे हनुमंत बनसोडे यांच्या आईवडीलांच्या स्मरणार्थ जि.प प्रा शाळा रेवली येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.स्मृतिशेष त्रिवेणी बनसोडे आणि स्मृतिशेष विठ्ठल बनसोडे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमीत्त जि प प्रा शाळा रेवली येथील इयत्ता 7 वीतील चि गोविंद अविनाश उपाडे आणि इयत्ता 8वी तील कु शामल मोकिंदा कांदे या विधार्थ्यांना वर्गात सर्वप्रथम आल्याबद्दल सन्मान चिन्ह आणि रोख 500 रु परितोषिक देवून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनोहर केदार तर प्रमुख .पाहुणे म्हणून बोधीसत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन रणखांबे,डाॅ.जे.एन.शेख हे उपस्थित होते.कार्यक्रमास पोलिस पाटील फुलचंद कांदे ,शेषराव बनसोडे, अविनाश उपाडे, बाबासाहेब बनसोडे, विशाल बनसोडे, रामभाऊ कांदे, शाहीर वाल्मिक साळवे,गंगाधर बनसोडे,रामभाऊ किरवले,श्रिकिशन कांदे, बालाजी बनसोडे,बबन कांदे सर यांनी सूत्रसंचालन केले,मारोती राठोडसर, मनिषा सरवदे मँडम, पल्लवी माळी,उषा तरडे व ईतर सर्व शिक्षक व शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व शेवटी हनुमंत बनसोडे यांनी विचार व्यक्त करुन सर्वाचे आभार मानले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here