Home चंद्रपूर आंतरराष्ट्रीय जलदिन व जलजागृती सप्ताह निमित्त 22 मार्च रोजी दिशादर्शन कार्यशाळेचे आयोजन

आंतरराष्ट्रीय जलदिन व जलजागृती सप्ताह निमित्त 22 मार्च रोजी दिशादर्शन कार्यशाळेचे आयोजन

55

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.20मार्च):-विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपुर अंतर्गत गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पाणीवापर संस्था, लाभधारकांच्या समृध्दीकरीता मुल येथील कन्नमवार सभागृहात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यशाळा ही दिनांक 22 मार्च 2022 रोजी सकाळी 10 ते सायं. 5.30 या वेळेत पार पडणार आहे. कार्यशाळेला प्रमुख उद्घाटक व मुख्य मार्गदर्शक म्हणून कृषी व जलतज्ञ डॉ.सुधिर भोंगळे, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोसेखुर्द प्रकल्प जलसंपदा विभागाचे डॉ. आशिष देवगड़े उपस्थित राहतील.

सदर कार्यशाळेचे आयोजन आंतरराष्ट्रीय जलदिन व जनजागृती सप्ताह 2022 चे औचित्य साधुन संपुर्ण गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. लाभधारकांमध्ये जल जागृती निर्माण व्हावी म्हणून पाणी बचतीचे महत्व पटवुन दिले जात आहे, प्रशिक्षण शिबीर, चर्चासत्र,विविध माध्यमांचा वापर करुन मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था मुंबई विद्यापीठाचे सहकार्याने आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेसाठी आसोला मेंढा नुतनीकरण विभागातील मुल, सावली, घोडाझरी कालवे विभाग,नागभीड, गोसेखुर्द उजवा कालवे ब्रम्हपुरी, धरण विभाग वाही, डावा कालवे पवनी अंतर्गत येणा-या सर्व पाणीवापर संस्थांचे संचालक मंडळ, लाभधारक शेतकर-यांना कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here