Home महाराष्ट्र पाचगावातील ग्रामसभेचा निर्णय सर्वोच्च देशी दारू दुकानाची परवानगी बाद..

पाचगावातील ग्रामसभेचा निर्णय सर्वोच्च देशी दारू दुकानाची परवानगी बाद..

325

🔹ग्रामसभेत नागरिकांच्या निर्णयामुळे दारू दुकानाची परवानगी रद्द

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.20 मार्च):- तालुक्यातील पाचगाव येथे नुकतीच ग्रामसभा पार पडली . यात दारू दुकान परवानगीचा मुद्दा चांगलाच गाजला . या देशी दारू दुकानाला नागरिकांनी परवानगी नाकारली . ग्रामसभेत चांगलाच गोंधळ उडाल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले . तालुक्यातील पाचगाव येथील ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कार्यालय परिसरात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते . सरपंच मुकुंदा शिवुरकार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेला ग्रामसेवक प्रदीप तलमले उपसरपंच व सर्व सदस्य उपस्थित होते ग्रामसभेत पाचगाव हद्दीत मोटवानी यांचा देशीदारू दुकान परवानगीसाठीअर्ज प्राप्त झाला होता . त्याअनुषंगाने या अर्जावर ग्रामसभेला उपस्थित नागरिकांची मते जाणून घेत मतदान घेण्यात आले .

त्यावेळी देशीदारू दुकानाला परवानगी देण्याच्या बाजूने 90 नागरिकांनी होकार दर्शविला , तर देशी दारू दुकानाला परवानगी न देण्याच्या बाजूने 137 नागरिकांनी मते दिली . त्यामुळे सदर देशी दारू दुकानाला परवानगी नाकारण्यात आली . यावेळी अन्य काही विषयांवर चर्चा आली . ग्रामसभेला एकूण 227 नागरिक उपस्थित होते . यावेळी विविध विषयांवरही ग्रामसभेत चर्चा करण्यात आली .जिल्हा दारूबंदी होण्यापूर्वी पारोमिता गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन दिवंगत सरपंच तिवाडे यांच्या कार्यकाळात झालेल्या ग्रामसभेत मोटवानी यांचा बार बंद करण्यात आला होता. यासाठी महिलांनी कंबर कसली होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here