Home चंद्रपूर जुनासुर्लात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची ५५लाख रुपयांचा वाचनालय व ग्रामपंचायत उभारण्याची घोषणा

जुनासुर्लात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची ५५लाख रुपयांचा वाचनालय व ग्रामपंचायत उभारण्याची घोषणा

138

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.20मार्च):-जुनासुर्ला , ता. मूल , जि. चंद्रपूर येथे २९ वे झाडीबोली साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले . साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय विजय वडेट्टीवार यांनी जुनासुर्ला येथे ३० लाखाचे वाचनालय व २५लाखाची ग्रामपंचायत इमारत उभारण्याची घोषणा केली .

झाडीबोली साहित्य संमेलन घेऊन शाखाध्यक्ष लक्ष्मण खोब्रागडे , स्वागताध्यक्ष रंजित समर्थ व कार्याध्यक्ष गणेश खोब्रागडे यांनी विदर्भाची मान उंचावली असून त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तितके कमी आहे . झाडीची उज्ज्वल परंपरा मराठीचे सोनेरी भविष्य दाखवेल असा आशावाद भाकीत करत पालकमंत्र्यांनी झाडीच्या दैदिप्यमान कार्याचा छोटासा भाग म्हणून ही घोषणा करताना अभिमान व्यक्त केला .पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या घोषणेचे सर्व स्तरावरून स्वागत होत असून अभिनंदन करण्यात येत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here