✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
पुणे(दि.19मार्च):-मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव अंतर्गत सोहम इन्स्टिट्यूट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी च्या एम ए योगिक सायन्स अभ्यासक्रमांतर्गत योग शिक्षिका वंदना चौधरी-ढाके यांचे सात दिवशीय निःशुल्क योग शिबिर आयोजित करण्यात आले आहे.हे शिबिर 19 ते 25 मार्च 2022 पर्यंत पुण्यातील रावेत येथील हॉलमार्क अव्हेन्यू रावेत या सोसायटीमध्ये संध्याकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. योगामुळे महिलांचे विविध आजार बरे होण्यास मदत होते.
आपल्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणावापासून मुक्त होण्यासाठी महिलांच्या जनजागृतीसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी चे संचालक डॉ.देवानंद सोनार ,प्रा.पंकज खासबागे,प्रा. गीतांजली भंगाळे, प्रा.ज्योती वाघ हे मार्गदर्शन करणार आहेत. योगशिक्षिका वंदना चौधरी-ढाके यांचे दुसरे निशुल्क योग शिबीर 25 मार्च नंतर सिल्व्हर पाल्म ग्रूव ,रावेत येथे होणार आहे.