



🔸महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ पिंपळगाव (भोसले) संस्थेचे संस्थापक, सचिव:- श्री नरहरी मुरारी क-हाडे
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.19मार्च):-महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ पिंपळगाव (भोसले) या शिक्षण संस्थेचे संस्थापक, सचिव श्री नरहरी मुरारी क-हाडे अ-हेरनवरगाव यांचे 18 मार्च 2020 ला निधन झाले असता महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ पिंपळगाव (भोसले) द्वारा संचालित- महाराष्ट्र विद्यालय, आवळगाव तालुका – ब्रह्मपुरी जिल्हा- चंद्रपूर या शाळेच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहिली.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही. बी. आडे सर यांनी सचिव साहेबांच्या कार्याचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगून मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमा प्रसंगी सौ. गिरी मॅडम, इरपाते, साखरे , येलके ,तालान, भावेसर ,लोखंडे ,रोहनकर ,राऊत, सुखदेवे उपस्थित होते.


