Home महाराष्ट्र शाळा महाविद्यालय परिसरात छेडछाड पथकाच्या फेऱ्या वाढवा

शाळा महाविद्यालय परिसरात छेडछाड पथकाच्या फेऱ्या वाढवा

107

🔹भाजपा विधार्थी आघाडीची मागणी

✒️अतुल बडे(प्रतिनिधी परळी)

परळी(दि.18मार्च):-कोव्हीड 19 मुळे गेल्या दोन वर्षांनंतर शाळा महाविद्यालय ,क्लासेस नव्याने सुरू झाल्या आहेत.त्यात एस टी महामंडळाचा संप अनेक महिन्यांपासून सुरु असल्यामुळे विद्यार्थीनी ना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे.

यादरम्यान रोडरोमिओ ऑटो स्टॅन्ड वर मुलींना त्रास देण्याचा काम करत आहेत त्याच बरोबर शाळा महाविद्यालय शिकवणी या ठिकाणी रोड रोमिओ त्रास देण्याचा काम करत आहेत काही महाविद्यालयात तर बाहेरून येणारे रोड रोमिओ भांडण देखील करत असल्याचे निदर्शनास आले आहे यामुळे शाळा व महाविद्यालय परिसरात चिडीमार फेऱ्या वाढवून रोड रोमिओ वर कडक कारवाई करा या मागणीचे निवेदन भाजपा विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांना देण्यात आले यावेळी विद्यार्थी नेते अमोल वाघमारे मुंजा फड आशीष मुंडे प्रदिप सुरवसे सुशांत गोलार आधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here