Home महाराष्ट्र शिवार साहित्य संमेलनातून लोकसंस्कृतीची उधळण होणार..

शिवार साहित्य संमेलनातून लोकसंस्कृतीची उधळण होणार..

303

होळी व रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातील कुरझडी येथे दि २०/३/२२ रोजी प्रथमच किरण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारा अस्सल ग्रामीण लोकसंस्कृतीची उधळण होणार असून संपूर्ण दिवसभर चालणाऱ्या या लोकसंस्कृती कार्यक्रमात शिवार कवी संमेलन, वृक्षारोपण,बहुरूपी गोंधळ, लोकरामायन, कवी साहित्यिक व कलावंतांचा सत्कार,असे भरगच्च कार्यक्रम निसर्गरम्यस्थळी कुरझडी येथे संपन्न होणार आहे.या संपुर्ण सनेलनाच्या संयोजक प्रा.डॉ रत्ना नगरे चौधरी यांनी एका प्रसिध्दी द्वारे ही माहिती दिली आहे.

किरण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा लोकसंस्कृती संदर्भातील हा पहिलाच कार्यक्रम असून शिवार साहित्य संमेलन ही या संस्थेच्या कार्यक्रमाची एक अभिनव संकल्पना असून या संमेलनातून समोर येत आहे. ग्रामीण साहित्यिक व कलावंतांना अभिव्यक्त होण्याची ही फार मोठी संधी संयोजकांनी उपलब्ध करून दिली आहे.

संपूर्ण दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण, पाहुण्यांचा परिचय,कविसंमेलन, गोंधळी व लोकरामायनाने होणार असून या कार्यक्रमाला नाट्य दिग्दर्शक व समीक्षक प्रा डॉ सतीश पावडे, कुरझडीचे सरपंच श्री.सुभाषराव चौधरी,केशवराव भोसले उपस्थित राहणार आहे.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री प्रदीप दाते यांची उपस्थिती राहणार असून कवी संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ साहित्यिक व कवी संजय इंगळे तिगांवकर भूषविणार असून कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत व अनिता कडू करणार आहेत.

शिवार साहित्य लोकसाहित्यातून लोकमानस, लोकपरंपरा, लोकश्रद्धा आणि लोकजीवन यांचे दर्शन घडणार आहे. लोकसंस्कृतीच्या अभ्यासासाठी ते गरजेचे असते. लोकसंस्कृतीच्या विविधांगांचे दर्शन घडविण्याचे आणि लोकपरंपरांचा परिचय करून देण्याचे मोलाचे काम किरण बहुउद्देशीय संस्थेचा आहे.या पार्श्वभूमीवर भजन,गोंधळी नृत्य,लोक रामायण कवी संमेलनाच्या माध्यमातून लोकसंस्कृतीचे वहन व्हावे व कलागुणांना वाव मिळावा हा व्यापक उद्देशयावं संस्थेचा असून सामान्यां जणांनपर्यत या लोककला पोहचविण्याचा मानस संस्थेचा आहे. लोककलांना प्रचार प्रसार व्हावा आणि नवीन पिढीला या संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी आणि ग्रामीण कलाकारांची कला कलाकारांची नोंद व्हावी, ग्रामीण बोली भाषेचे सौंदर्य जोपासले जावे आणि या सगळ्या गोष्टींची ओळख नवीन पिढीला व्हावी हा व्यापक उद्देश ठेवून शिवार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोककला ही कलावंताच्या अंगकृतीतून उत्फूर्तपणे प्रसवणारी निसर्गदत्त देणगी आहे. निसर्गाने मानवाला बहाल केलेल्या देणगीरूपी कलेचा प्रत्यय खर्‍या हाडाच्या कलाकाराच्या कलाविष्कारातून येतो. भारतात विविध राज्यांत आणि प्रांतात त्या-त्या रूढी-परंपरांनुसार तेथील सांस्कृतिक जडणघडण झालेली आहे. महाराष्ट्राला विविधांगी लोककलांची विविधता लाभली आहे. या लोककलांचा अनेक पिढ्यांनी वारसा जपून ठेवला आहे.

लोककलेची ताकद इतकी मोठी आहे की, तिच्या सादरीकरणाने आत्मभान हरपून जाते. लोककलेचे विविध प्रकार आहेत. भजन, कीर्तन, भराड, ललित, भारूड, पोवाडे, शाहिरी, वासुदेव, नंदीवाले, बहुरूपी दशावतार, गोंधळ, जागरण, गण, गवळण, बतावणी, लावणी, लोकनाट्य, कटाव, तमाशा, ढोलकी फड, जात्यावरील ओव्या, झिम्मा-फुगडी, लोकगीते, इत्यादी. .

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत मानाचा तुरा खोवण्यात वर्धा जिल्ह्याचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. वर्धा जिल्हा हा लोककलेचा वारसा जतन करणारा जिल्हा आहे. जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख इथल्या दिग्गज लोककलावंतांनी आपल्या दर्जेदार कला प्रकारांतून महाराष्ट्रच नव्हे तर देशाला करून दिली आहे.

खरा भारत ग्रामीण भागात आहे.गांधीजींनी खेड्याकडे परत चला,असा संदेश आपल्या तत्वज्ञातून दिला होता.ग्रामीण भारतच नव्हे तर भारत स्वावलंबी झाला पाहिजे,यासाठी म गांधीजींनी स्वावलंबन, ग्रामोद्योग,कुटिरोद्योग, व लोककलांना प्रोत्साहन दिले होते.याचे दर्शन या संमेलनातून होणार आहे.

शिवार साहित्य संमेलनाची विशेषतः म्हणजे
या संमेलनात ग्रामीण जीवनाचा भाग म्हणून तिथे ग्रामीण वापरातील वस्तूंचा संग्रह तसेच व्यासपीठाची रचना सुद्धा ग्रामीण संकल्पनेनुसार (थीमनुसार) होणार आहे.
किरण बहु उद्देशीय संस्थेचा सेवाभाव उपक्रमातून नवोदितांना प्रेरित करण्याचे कार्य वाखण्याजोगे आहे
किरण बहू उद्देशीय सेवाभावी संस्था ही वर्धा जिल्ह्यातील एक सेवाभावी संस्था असून या संस्थेने आता पर्यत अनेक अभ्यासू व हुशार विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची व्यवस्था व गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहासाठी आर्थिक मदत ,कोरोना काळात स्वच्छता कर्मचारी, कचरा गाडी वरची कामे व नाली साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी व शेतात काम करणाऱ्या शेतमजूर स्त्रियांसाठी व शेतमजुरांसाठी चार महिने किराणा राशन ची मदत केली व त्यांना घर चालवण्यासाठी आर्थिक मदत देखील संस्थेने केली. याशिवाय ही संस्था विविध शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घेत असून नुकतेच या संस्थेने मिळून मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातील नवोदित साहित्यिक कवी व लेखकांना सन्मान करून त्यांचा गौरव केला.नवीन लोकांना नवीन कलाकारांना संधीउपलब्ध करून देण्याचा व महिलांना अधिक सक्षम करण्याचा संस्थेचा मानस आहे.या दृष्टीने किरण बहुउद्देशीय संस्थेची वाटचाल सुरू असल्याचा मनोदय या संस्थेच्या अध्यक्षा व शिवार संमेलनाच्या अध्यक्षा प्रा डॉ रत्ना नगरे यांनी व्यक्त केला आहे.

✒️प्रा डॉ सुधीर अग्रवाल(९५६१५९४३०६)

Previous articleदिग्रस येथे दोन दिवशीय महिला समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
Next articleशाळा महाविद्यालय परिसरात छेडछाड पथकाच्या फेऱ्या वाढवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here