




✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.18मार्च):-दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्रस च्या वतीने महिला समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर दि.९ व १० एप्रिल २०२२ शनिवार व रविवार रोजी आयोजित करण्यात आले आहे.
या महिला समता सैनिक दल शिबिराला प्रशिक्षण देण्याकरिता मुंबई वरून दोन महिला सैनिक प्रशिक्षक येणार आहेत.या शिबिरामध्ये प्रशिक्षण घेण्याकरिता महागाव (पोलिस स्टेशन)
येथील ३० महिला सैनिक,आंरभी, हरसूल व दिग्रस मधील ४५ महिला सैनिक असे एकूण ७५ महिला सहभागी होणार आहेत .
प्रथमच दिग्रसमध्ये महिला समता सैनिक दलाची स्थापना करण्यात येत आहे.तरी दिग्रस मधील सर्व बौद्ध महिला भगिनींनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवावा व आलेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन उज्वला मानकर,अनुसया वाठोरे,सुनिता मनवर,लता भरणे, वर्षा वागदे,मिनाक्षी मोरे, रेखा तायडे,स्नेहा तुपसुंदरे,आशा भगत,कविता बोडखे, यमुना बोरकर, कांता बोडखे, चंदा भगत,जयश्री खंदारे तसेच इत्यादी पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने करण्यात येत आहे.




