Home महाराष्ट्र नाशिक जिल्हयातील कांदा निर्यात क्षमता दुप्पटी ने वाढवा –काॅग्रेस चे जेष्ठ नेते...

नाशिक जिल्हयातील कांदा निर्यात क्षमता दुप्पटी ने वाढवा –काॅग्रेस चे जेष्ठ नेते एकनाथ गायकवाड

193

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.17मार्च):-जील्हा व प्रत्येक तालुक्यात चालु वर्षी भरपुर प्रमाणात पाऊस पडल्याने रब्बी हंगामातील कांदा उत्पादन चांगल्या प्रकारे आले आहे त्यामुळे कांदयाची आवक मोठया प्रमाणात वाढत आहे त्यामुळे आज रोजी कांदयाचे बाजार भाव मोठया प्रमाणात घसरण झाली आहे या साठी केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याची दखल घेत कांदयाची निर्यात क्षमता दुप्पटिने वाढवावी आशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान कॉग्रेस पक्षाचे सचिव एकनाथ गायकवाड यांनी मा नामदार उध्वजी ठाकरे आणि प्रदेश अध्यक्ष मा नानासाहेब पटोले यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे केंद्र सरकारच्या चुकिच्या शेतकरी धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याना महागडी खते डिझेल औषधे वाढती शेतमजुरी या मुळे कांदा उत्पादन खर्च वाढला आसुन आजरोजी विकलेल्या भावात कांदा परवडंत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

देशातील भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे यांना शेतकऱ्याचे काहि देणे घेणे नाही मागील काळात शेतकऱ्याना न्याय हकक मिळणे साठी तबल एक वर्षाच्या पुढे अंदोलन करावे लागले आहे या आगोदर कॉग्रेस पक्षाचे सरकार असंतांना शेतकऱ्याना ऐवढे दिवस कधी अंदोलने कधी करावे लागत नव्हते कांदयाचा दरात जर घसरण झाली असेल तर तातडीची बैठक घेऊन शेतकऱ्याचा प्रश्न सोडविला जात होता तरी केंद्र सरकासने आजरोजी शेतकऱ्याचे प्रश्न सोडविले जावे असे गायकवाड़ यांनी निवेदनात नमुद केले आहे शेतकऱ्याचा कमी भावात विकलेला कांदयाला आनुदान देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनाच्या प्रति केद्रिय कृषीमंत्री , महसुल मंत्री बाळासाहेब थोरात महाराष्ट्र राज्य कृषीमंत्री दादासाहेब भुसे अन्न नागरिक पुरवठा मंत्री तथा नासिक जिल्हा पालक मंत्री छगन भुजबळ, कृषीआयुक्त कार्यालय यांना देण्यात आल्या आहे

Previous articleसालेगाव येथिल अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता
Next articleदिग्रस येथे दोन दिवशीय महिला समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here