



🔹पालकमंत्र्यांकडून जिल्हावासीयांना होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.17मार्च):-कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दोन वर्ष होळी साजरी करता आली नाही. मात्र, दोन वर्षानंतर कोरोनाच्या संकटातून सावरून होळीचा सण साजरा करीत आहो.
होळीचा सण साजरा करतांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून सुरक्षित होळी साजरी करा, रुग्ण संख्या कमी झाली असली तरी आरोग्याची काळजी घेणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.





