




✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.17मार्च):-होळी, धुळीवंदन सण असल्याने शांततेसाठी घुग्घुस पोलिसांनी “रुटमार्च” काढला.घुग्घुस पोलीस स्टेशन, जुना बसस्थानक, गांधी चौक ते नगर परिषद मार्गे रूटमार्च काढण्यात आला.
यावेळी ठाणेदार बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनात सहा.पो.नि.संजय सिंग, उप पोलीस निरीक्षक गौरीशंकर आमटे, गुन्हे पथकाचे मनोज धकाते, महिला पोलीस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते.




