



🔸स्मृतीशेष उपरे काकांच्या स्मृति दिनानिमित्त अर्धाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभास उपस्थित राहण्याचे मान्यवरांचे आवाहन
✒️समाधान गायकवाड(बीड प्रतिनिधी)
बीड(दि.17मार्च):-स्मृतीशेष हनुमंत उपरे काकांनी विज्ञानवादी,समताधिष्ठित बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल्या समाजातील अठरापगड जातीतील लोकांना सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या माध्यमातून “चलो बुध्द कि ओर”.”ओबीसी आता बुध्द धम्माच्या वाटेवर” अभियाना तुन संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यांत ही ओबीसी धर्मांतर जनजागृतीची मोठी कृतिशील चळवळ उभारली.असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ. गणेश खेमाडे यांनी प्रतिपादन केले.बीड तालुक्यातील कामखेडा,आहेर चिंचोली, नांदूर हवेली,येथे स्मृतीशेष हनुमंत उपरे काका यांचा अर्धाकृती पुतळा अनावरण व गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमंत्रणा साठी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या संवाद व निमंत्रण बैठकीस सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्याध्यक्ष संदीप उपरे,राज्य सल्लागार संतोषभाऊ उपरे,तसेच राज्य संघटक अमरसिंह ढाका,संविधान युवा मंचचे अडवोकेट राजेश शिंदे,वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका अध्यक्ष किरण वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते संगमेश्वर आंधळकर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.खेमाडे म्हणाले की,ओबीसी बांधवांनी आत्मसन्मानासाठी स्मृतीशेष हनुमंत काका उपरे यांनी सुरू केलेली ही सांस्कृतिक,धार्मिक परिवर्तनाची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमास बहुसंख्येने स्मृतिस्थळी मौजे घोसापुरी येथे उपस्थित राहावे.राज्य संघटक अमरसिंह ढाका यांनी स्मृतीशेष हनुमंत उपरे काकांच्या स्मृतींना उजाळा देऊन काकांच्या जीवन कार्याची सविस्तर माहिती दिली.
राज्याध्यक्ष संदीप जी उपरे यांनी स्मृतीशेष हनुमंत काकांच्या अर्धाकृती पुतळा अनावरण समारंभ व हनुमंत उपरे काका गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची रूपरेषा विशद केली.श्रवणीय व ऐतिहासिक भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या धम्मदेसना कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे.असे आवाहन केले.संविधान युवा मंच एडवोकेट राजेश शिंदे यांनी 19 मार्च रोजी सकाळी ठीक आठ वाजता स्मृतीशेष हनुमंत उपरे काका यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन केल्याची माहिती दिली. ही मोटारसायकल रॅली सुभाष रोड इथून सुरू होऊन शहरातील महापुरुषांना अभिवादन करून स्मृतीशेष हनुमंत उपरे काका स्मृतिस्थळी विसर्जित होईल अशी माहिती दिली. या मोटरसायकल रॅलीमध्ये परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. संवाद बैठकीस व निमंत्रण देण्यात आलेल्या मान्यवरांचे आभार प्रवेश ईनकर,रवींद्र हुंबरे,आप्पासाहेब हुंबरे यांनी मानले.या बैठकीस गावातील प्रतिष्ठित नागरिक ,युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.





