Home महाराष्ट्र घुग्घुस येथील राजीव रतन चौकात 24 तास वाहतूक पोलीस तैनात करा

घुग्घुस येथील राजीव रतन चौकात 24 तास वाहतूक पोलीस तैनात करा

296

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

🔸विवेक बोढे यांची निवेदनातून मागणी

घुग्घुस(दि.17मार्च):-येथील राजीव रतन चौकात चोवीस तास वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी ठाणेदार बबन पुसाटे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सध्या राजीव रतन चौकातील रेल्वे फाटकावर नवीन उडान पुलाचे बांधकाम सुरु आहे. बांधकाम सुरु असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. दररोज रेल्वेच्या कोळशाच्या वॅगन भरून जात असल्याने अर्ध्या ते एक तासाच्या अंतरात हे रेल्वे फाटक बंद असते त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात व रेल्वे फाटक सुरु होताच याठिकाणी वाहतूक विस्कळीत होते.

वाहतूक विस्कळीत होत असल्याने अनेक अपघात घडले आहे. ही समस्या लक्षात घेत भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी शिष्टमंडळासह ठाणेदार बबन पुसाटे यांची पोलीस ठाण्यात भेट घेतली व चर्चा केली व राजीव रतन चौकात चोवीस तास वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.निवेदन देतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, माजी तंमुस अध्यक्ष मल्लेश बल्ला, भाजपाचे संजय जोगी, चिंचोळकर महाराज उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here