Home महाराष्ट्र साळवा केंद्रस्तरीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न

साळवा केंद्रस्तरीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न

306

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगाव(दि.17मार्च):-तालुक्यातील साळवा केंद्रस्तरीय शाळा व्यवस्थापन सक्षमीकरण प्रशिक्षण केंद्र शाळा साळवा येथे गटशिक्षण अधिकारी विश्वास पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी सि.डी.ठाकूर,केंद्रप्रमुख एम.के.पवार,डॉ. घनश्याम जाधव,यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले.

प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक कैलास पवार,ज्योती राणे,यांनी शाळा व्यवस्थापन समितीची रचना कार्य व जबाबदाऱ्या आर्थिक व्यवस्थापन,शाळा विकास आराखडा, निपून भारत अभियान,बालकांचे हक्क व सुरक्षितता,शालेय आपत्ती व्यवस्थापन,सामाजिक अंकेक्षण बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साळवा बॉईज,कन्या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले. प्रशिक्षणास साळवा केंद्रातील मुख्याध्यापक, उपशिक्षक,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,व सदस्य उपस्थित होते

Previous articleडॉ.बाबासाहेबांचे महारवतन बील!
Next articleघुग्घुस येथील राजीव रतन चौकात 24 तास वाहतूक पोलीस तैनात करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here