Home महाराष्ट्र कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस राहिल्यास प्रहार संघटना घेणार साखर आयुक्ताकडे धाव घेणार: सोमनाथ...

कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस राहिल्यास प्रहार संघटना घेणार साखर आयुक्ताकडे धाव घेणार: सोमनाथ जाधव

94

✒️मोहोळ,तालुका प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)

मोहोळ(दि.16मार्च):-करमाळा व माढा या दोन्ही तालुक्यातील कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करू नये.कारखाना कार्य क्षेत्रातील जाणीवपूर्वक उभा ठेवून इतर जिल्ह्यातून ऊस आणला जातोय . सुरवातीपासूनच गेट केन उसावर भर देऊन या तालुक्यातील शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक पिळवणूक केली आहे.

परंतु यातील ज्या कारखान्याचे कार्यक्षेत्रातील ऊस उभा राहिल्यास प्रहार संघटना जातीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहून जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील व शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली साखर आयुक्त समोरआंदोलन करून संबंधित साखर कारखान्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी हजारो शेतकऱ्यांसह प्राणांतिक उपोषण केले जाईल.असा इशारा प्रहार संघटना तालुका अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी दिला आहे. तरी या दोन्ही तालुक्यातील साखर कारखान्यांनी यांची गांभीर्याने दखल घ्यावी.अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करणार..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here